Sunday, 26 July 2026

'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर' अभियानातून नागरिकांना २९ शासकीय सेवा एकाच छताखाली

  

'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर' अभियानातून

नागरिकांना २९ शासकीय सेवा एकाच छताखाली

अपर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात

मुंबई, दि. २६ : महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करण्याच्या उद्देशाने शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी मुंबई शहर जिल्ह्यात 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर' अभियान राबविण्यात येत असल्याचे मुंबई शहर जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात यांनी सांगितले.

 

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर यांच्या वतीने दि. २२ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत मुंबई शहरातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत १७८-धारावी विधानसभा मतदारसंघातील भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi