Sunday, 26 July 2026

शासनाच्या विविध योजना व सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत 'एकाच छताखाली'

 यावेळी मुंबई शहराचे अपर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात म्हणाले की, राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये हे अभियान राबविण्यात येत असून शासनाच्या विविध योजना व सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत 'एकाच छताखाली' पोहोचविण्याचा हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दिले जाणारे विविध महसुली दाखले, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेवा, आधार सेवा, दिव्यांग सेवा, संजय गांधी निराधार योजना, रेशन कार्डविषयक सेवा आदींसह एकूण २९ सेवा या शिबिरात उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यासाठी १९ स्टॉल उभारण्यात आले असून नागरिकांनी या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi