Sunday, 26 July 2026

महाआरोग्य शिबिरात हृदयरोग, त्वचा, कर्करोग, र्रोग, आकस्मिक विभाग, नेत्र, ईएनटी, यासह अनेक आजारांची तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत

 अनेक संस्थांतर्फे यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी तसेच गंगाधरराव फडणवीस स्मृती डायग्नोस्टिक सेंटरला देणगी आणि रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली. हे सर्व दाते तसेच महाशिबिराच्या आयोजनात सहभागी डॉक्टरांचा सत्कार यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. आभार शिबिराचे सहसंयोजक नगरसेवक रितेश गावंडे यांनी मानले. कायर्क्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

 

दरम्यान या महाआरोग्य शिबिरात हृदयरोग, त्वचा, कर्करोग, र्रोग, आकस्मिक विभाग, नेत्र, ईएनटी, यासह अनेक आजारांची तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत करण्यात आली. नागपूर शहर तसेच जिल्ह्यातून आलेल्या हजारो रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतला. या रुग्णांना औषधे निःशुल्क देण्यात आली तसेच त्यांच्या विविध चाचण्या आणि शस्त्रक्रियांसह अन्य उपचारांची व्यवस्थाही आयोजकांतर्फे नि:शुल्क करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi