पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापनासाठी 'महाराष्ट्र शासन ॲक्शन मोड'वर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य आपत्ती नियंत्रण कक्षामध्ये आयोजित बैठकीत राज्यातील पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. आपत्ती व व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल यांनी यावेळी कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली.
नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर, मदत व बचावकार्य, तसेच आपत्कालीन नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवणे अशा विविध उपाययोजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. याशिवाय नागरिकांना सतर्क राहण्याचे, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शासनाच्या या तत्पर आणि नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळे पावसाळ्यातील आपत्तींचा परिणाम कमी करून जनजीवन सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
No comments:
Post a Comment