पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापनासाठी 'महाराष्ट्र शासन ॲक्शन मोड'वर
मोशी येथे घडलेल्या दुर्घटनेतील नऊ जणांना बाहेर काढण्यात यश
मुंबई, दि. ९: पुणे जिल्ह्यातील मोशी येथे दुर्घटनेत इमारतीत अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून प्राप्त माहिती नुसार नऊ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे असे राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने कळविले आहे. मोशी येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी काल रात्री भेट देऊन सुरू असलेल्या बचावकार्याची पाहणी केली.
दुर्घटनेच्या वेळी इमारतीत एकूण २३ नागरिक अडकले होते. त्यापैकी इमारतीच्या वरच्या मजल्यावर असलेले ५ नागरिक स्वतःहून सुरक्षित बाहेर आले, उर्वरित नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
पावसाळ्यात अतिवृष्टी, पूर, भूस्खलन, वादळी वारे आणि इतर नैसर्गिक आपत्तींचा धोका लक्षात घेऊन राज्य शासन 'ॲक्शन मोड'वर कार्यरत झाले आहे. राज्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, जिल्हा प्रशासन, पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य विभाग तसेच राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांच्यात समन्वय साधून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. पुणे येथील मोशी व पालघर मधील पुरस्थितीत बचाव कार्य, व घटनांमुळे नागरिकांचे प्राण वाचले आहेत.
No comments:
Post a Comment