मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त कंपनीमध्ये एमएडीसीसोबत सिडको, एमआयडीसी आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांचा सहभाग असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी हडकोमार्फत ६ हजार कोटी रुपयांच्या कर्जास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती देत सर्व कामे नियोजित वेळेत पूर्ण करावीत.
कुंभमेळा-२०२७ दरम्यान देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक शिर्डीत येणार असून चार्टर्ड विमानांचीही मोठ्या प्रमाणात ये-जा अपेक्षित आहे. त्यामुळे शिर्डी विमानतळावरील टॅक्सीवे, एप्रन, एअर कार्गो कॉम्प्लेक्स तसेच इतर आवश्यक सुविधांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
No comments:
Post a Comment