राज्यातील विमानतळांच्या विकासाला वेग
एमएडीसीमार्फत नांदेड, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गोंदिया आणि अमरावती या सात विमानतळांचा विकास करण्यात येत असून रत्नागिरी विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात आहे.
बारामती विमानतळाच्या आधुनिकीकरणासाठी ६४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून लातूर विमानतळासाठी ३८ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. कराड विमानतळाच्या १,७०० मीटर धावपट्टीच्या विस्ताराची कार्यवाही सुरू असून भविष्यात येथे नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. तसेच चंद्रपूर येथील फ्लाईंग क्लब तसेच धाराशिव आणि यवतमाळ येथील विमानतळ करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.
No comments:
Post a Comment