नवी मुंबई विमानतळ उभारणीच्या अनुभवाचा उपयोग करुन
विमानतळ विकासाची कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावीत
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
• पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ६ हजार कोटी रुपयांच्या कर्जास मंजुरी
• नांदेड विमानतळावर अत्याधुनिक टर्मिनल उभारणार
मुंबई, दि. ३० : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीचा यशस्वी अनुभव लक्षात घेऊन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी)ने पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकासही निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअर कार्गो कॉम्प्लेक्ससह विविध पायाभूत सुविधा आगामी कुंभमेळा-२०२७ पूर्वी पूर्ण करण्यासाठी आवश्यक यंत्रणा बळकट करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) संचालक मंडळाची ९३ वी बैठक मंत्रालयात झाली. बैठकीस एमएडीसीचे कार्यकारी संचालक दीपक कपूर, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव डॉ.श्रीकर परदेशी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बलगन, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, आयुक्त विपिन इटनकर तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment