Friday, 31 July 2026

आरोग्य सेवेत तंत्रज्ञानाची नवी क्रांती; १०२ रुग्णवाहिकासाठी "कॅशलेस पेट्रोकार्ड'चे आरोग्यमंत्र्यांचे हस्ते उदघाटन

 आरोग्य सेवेत तंत्रज्ञानाची नवी क्रांती;

१०२ रुग्णवाहिकासाठी "कॅशलेस पेट्रोकार्ड'चे आरोग्यमंत्र्यांचे हस्ते उदघाटन

 

मुंबई, दि. ३० : राज्यातील आरोग्य सेवा अधिक तंत्रस्नेही करण्यासाठी शासन प्रयत्नशील असुन, कॅशलेस 'पेट्रोकार्ड' उपक्रम हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे.  यामुळे १०२ रुग्णवाहिका सेवांचे व्यवस्थापन अधिक सक्षम होईल, असा विश्वास सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला. मुंबईतील आरोग्य सेवा आयुक्तालय येथे आयोजित कार्यक्रमात 'कॅशलेस पेट्रोकार्ड  उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले. 

यावेळी आरोग्य सेवा आयुक्त, संजय काटकर, अतिरिक्त आयुक्त जगन्नाथ विरकर, आरोग्य संचालक डॉ.नितीन अंबाडेकर, सहसंचालक सुनिता गोलाईत, प्रकल्प संचालक (ईएमएस) रवींद्र सावंत,उपसंचालक जयंत मुळे, तसेच दूरदृष्य प्रणाली द्वारे संचालक विजय कंदेवाड, व राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि हिंदुस्थान पेट्रो केमिकल लिमिटेड कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi