राज्याचे महा एआय मॉडेल प्रशासनासाठी गेमचेंजर
राज्य शासन आणि राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने (एनआयसी) विकसित केलेले महा एआय मॉडेल हे महाराष्ट्राच्या डिजिटल प्रवासातील महत्त्वाचे पाऊल असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. शासनाकडे सर्वाधिक प्रमाणात डेटा निर्माण होतो आणि वापरला जातो. डेटा हेच आजचे नवीन सोने आणि नवीन तेल असल्याचे नमूद करत त्यांनी शासनाचा डेटा शासनाच्या स्वतःच्या एआय मॉडेलद्वारे वापरणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. स्वतःच्या डेटावर प्रशिक्षित होणारी एआय प्रणाली भविष्यातील सायबर आणि माहितीविषयक धोक्यांपासून संरक्षण देण्यास मदत करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महा एआय मॉडेल प्रशासनातील कार्यक्षमता वाढविणे, निर्णय प्रक्रिया गतिमान करणे आणि नागरिकांना अधिक जलद सेवा देण्यासाठी उपयुक्त ठरेल. याच्या सातत्यपूर्ण वापरातून आणि प्रशिक्षणातून प्रशासन अधिक प्रतिसादक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
No comments:
Post a Comment