Tuesday, 16 June 2026

भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु ; दर्शनाकरिता पास अनिवार्य-जिल्हा प्रशासनाची माहिती

 भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु ;

दर्शनाकरिता पास अनिवार्य-जिल्हा प्रशासनाची माहिती

 

पुणे, दि. १५: भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु झाले असून मंदिरात प्रतिदिन एक हजार भाविकांना प्रवेश देण्यात येणार आहे. भाविकांनी  दर्शनासाठी मंदिर व्यवस्थापन समितीच्या  https://shreebhimashankar.com या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर पास उपलब्ध होणार आहे. नोंदणीकृत भाविकांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार असून दर्शनाकरिता पास अनिवार्य करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. 

 

भाविकांना  ३० जून २०२६ पर्यंत दररोज सकाळी ७ ते ११ वा. दर्शन सुविधा उपलब्ध असणार आहे. ऑनलाईन नोंदणी केलेल्या भाविकांनी दर्शनासाठी येताना वैध ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य करण्यात आले आहे.  भाविक तसेच स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासन यांना सहकार्य करावे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi