महासारथीमुळे योजनांची अचूक अंमलबजावणी शक्य
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महासारथी अंतर्गत तयार करण्यात आलेला एकात्मिक डेटा पूल केवळ शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठीच उपयुक्त ठरणार नाही, तर भविष्यातील योजना तयार करणे, त्यांचे नियोजन करणे आणि लक्ष्यित पद्धतीने अंमलबजावणी करणे यासाठीही महत्त्वपूर्ण ठरणार आहे.या प्रणालीमुळे लाभार्थ्यांचे डुप्लिकेशन टाळणे, योजनांतील गैरवापर ओळखणे आणि पात्र नागरिकांना कोणत्याही अडथळ्याशिवाय योजनांचा लाभ मिळवून देणे शक्य होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment