महा-एआय मॉडेलद्वारे डेटा-आधारित प्रशासन उभारण्याच्या दिशेने
शासनाचे महत्त्वाचे पाऊल
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
• महासारथी, महाडीबीटी २.०, डिजिटल हयातीचा दाखला आणि राज्याच्या महा एआय मॉडेलचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण
मुंबई, दि. २४ : नागरिकांचे जीवन अधिक सुलभ करण्यासाठी राज्य शासन सातत्याने तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. राज्याच्या एआय मॉडेलद्वारे ज्ञानाधारित आणि डेटा-आधारित प्रशासन उभारण्याच्या दिशेने महाराष्ट्राने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. या नवीन उपक्रमांमुळे राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक वेगाने, सुलभतेने आणि पारदर्शकपणे उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
विधानभवन येथे महासारथी, महाडीबीटी २.०, सेवा केंद्रांचे मानकीकरण, डिजिटल लाईफ सर्टिफिकेट आणि राज्याच्या एआय मॉडेलच्या लोकार्पणप्रसंगी बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अॅड आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते, सर्व विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग, व्ही.सी.द्वारे, सर्व विभागीय आयुक्त, सर्व पोलीस महानिरीक्षक, विशेष पोलीस महानिरीक्षक, सर्व जिल्हाधिकारी, सर्व आयुक्त महानगरपालिका, सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व पोलीस अधीक्षक बैठकीला उपस्थित होते. यावेळी लाभार्थी मधुकर मोरे व वत्सला पाटील यांना हयातीच्या दाखल्याचे वितरण करण्यात आले.
No comments:
Post a Comment