Tuesday, 16 June 2026

केंद्र शासनाच्या सहकार्याने मुंबईतील आकाशवाणीच्या विस्तीर्ण जागेवर अत्याधुनिक मीडिया हब उभारण्याची

 केंद्र शासनाच्या सहकार्याने मुंबईतील आकाशवाणीच्या विस्तीर्ण जागेवर अत्याधुनिक मीडिया हब उभारण्याची योजनाही सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. या सुविधेमुळे मीडिया आणि सर्जनशील उद्योग क्षेत्राला मोठी चालना मिळेल, असे ते म्हणाले.

लघुपट, माहितीपट आणि ॲनिमेशन चित्रपट हे सर्जनशीलतेचे आव्हानात्मक आणि प्रभावी माध्यम असल्याचे सांगत मंत्री ॲड.शेलार यांनी मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा जागतिक दर्जाच्या सर्जनशीलतेला नवे व्यासपीठ उपलब्ध करून देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रीय सचिव चंचल कुमार तर एनडीएफसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी आभारप्रदर्शन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते अभिनेते जयदीप, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय ज्युरी, प्रेस ज्युरी, स्क्रू कॉस्ट यांना सन्मानित करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi