शासन खंबीरपणे पाठीशी
महाराष्ट्र शासनाने मृद व जलसंधारण विभागासाठी निधी वाढवला आहे. गावागावात जलसंधारणाची कामे सुरू आहेत. पण हे फक्त शासनाचे काम नाही, ही जनचळवळ आहे. 'पाणी अडवले तरच जीवन जगेल' हे सूत्र प्रत्येकाने अंगीकारले पाहिजे.
एल निनो, दुष्काळ हे सगळे जोडले गेले आहेत. पण आपला शेतकरी हा मातीचा कैवारी आहे. त्याने अनेक संकटे झेलली आहेत. म्हणून मी सांगतो की, एल निनोची भीती बाळगू नका. तयारी करा. कारण संकटापूर्वी व्यवस्थापन करणारा समाजच इतिहास घडवतो. पाऊस निसर्ग देईल, पण पाणी अडवण्याची जबाबदारी आपली आहे. चला, मिळून महाराष्ट्राला 'जलसमृद्ध महाराष्ट्र' बनवूया.
No comments:
Post a Comment