Tuesday, 16 June 2026

भारतीय माध्यम आणि मनोरंजन उद्योगाने 2023 मध्ये 9 टक्क्यांची वाढ नोंदवत 2.78 ट्रिलियन रुपयांचा टप्पा

 माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. मुरुगन म्हणाले की, भारताची सर्जनशील राजधानी असलेल्या मुंबईत मिफ्फसारख्या प्रतिष्ठित महोत्सवाचे आयोजन होत असल्याचा आनंद आहे. भारत आज जगाच्या नजरेत एक सर्जनशील महासत्ता आणि विश्वासार्ह कंटेंट निर्मिती भागीदार म्हणून उदयास आला असून भारतीय कथा जगभरातील प्रेक्षकांना प्रेरणा देण्याची क्षमता बाळगत असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतीय माध्यम आणि मनोरंजन उद्योगाने 2023 मध्ये 9 टक्क्यांची वाढ नोंदवत 2.78 ट्रिलियन रुपयांचा टप्पा गाठला असल्याचे सांगताना त्यांनी डिजिटल माध्यमांनी प्रथमच 1 ट्रिलियन रुपयांहून अधिक महसूल प्राप्त केला असल्याचे नमूद केले. 2028 पर्यंत हे क्षेत्र 3.3 ट्रिलियन रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा असून वार्षिक 7 टक्क्यांहून अधिक वाढ कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

देशात 2023 मध्ये 1,900 हून अधिक चित्रपट प्रदर्शित झाले असून चित्रपटगृहांच्या महसुलात 16 टक्क्यांची वाढ झाली आहे. दूरचित्रवाणी अजूनही दर आठवड्याला सुमारे 74.5 कोटी प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असून ओटीटी आणि डिजिटल माध्यमांची भूमिकाही वेगाने वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi