माध्यम व मनोरंजन क्षेत्राची देशात अभूतपूर्व प्रगती
– केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन
· केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते मिफ्फ - 2026 चा शुभारंभ
मुंबई, दि. 15 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली गेल्या बारा वर्षांत देशाच्या माध्यम व मनोरंजन क्षेत्राने अभूतपूर्व प्रगती केली आहे. गेल्या वर्षी मुंबईत झालेल्या जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेमुळे (वेव्ह्ज) या क्षेत्राच्या वाढीची प्रचिती आली, असे प्रतिपादन केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन यांनी केले.
19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात Mumbai International Film Festival (मिफ्फ) चे मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी इलेक्ट्रॉनिक्स माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, उपस्थित होते.
No comments:
Post a Comment