जागतिक अर्थव्यवस्थेतील भारताची वाढती भूमिका प्रशंसनीय
- सायप्रसचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडोलाइड्स
· राष्ट्रपतींच्या हस्ते 'एनएसई ' मध्ये घंटानाद
मुंबई, दि. २१ : सायप्रस आणि भारतामधील आर्थिक आणि धोरणात्मक संबंध आता एका नवीन टप्प्यावर आले आहे. भारताचे आर्थिक सामर्थ्य, नाविन्यता आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील वाढत्या भूमिका प्रशासनीय आहे, असे गौरवोद्गार सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडोलाइड्स यांनी काढले.
बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स स्थित नॅशनल स्टॉक एक्सचेंज येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती क्रिस्टोडोलाइड्स बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय शेअर बाजाराचे अध्यक्ष श्रीनिवास इंजेटी, व्यवस्थापकीय संचालक आशिष कुमार चौहान उपस्थित होते.
कार्यक्रम दरम्यान राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडोलाइड्स यांच्या हस्ते नॅशनल स्टॉक एक्सचेंज येथे घंटानाद करण्यात आला.
राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडोलाइड्स म्हणाले, सायप्रस हा युरोपीय महासंघ आणि युरोझोनचा एक महत्त्वाचा सदस्य देश आहे. सायप्रसकडे सध्या यूरोपीय महासंघाच्या परिषदेचे अध्यक्षपद आहे. या अध्यक्षपदाच्या काळात सायप्रसने भारत आणि यूरोपीय महासंघ यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. सायप्रसच्या अध्यक्षपदाच्या पहिल्याच महिन्यात भारत आणि यूरोपीय महासंघादरम्यान मुक्त व्यापार करारावर सहमती झाली होती. सायप्रस हा भारत, यूरोप, पूर्व भूमध्य समुद्र आणि मध्य पूर्व या क्षेत्रांना जोडणारा एक नैसर्गिक दुवा म्हणून काम करतो.
No comments:
Post a Comment