‘नारी शक्तीः विकसित भारत की आवाज’ या विषयावर आधारित महिला युवा संसद हा कार्यक्रमाचा विशेष भाग असेल. या सत्रात महिला सहभागी महिला आरक्षण विधेयकावर संसदीय पद्धतीने चर्चा करतील. पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी 12 एप्रिलच्या सायंकाळी भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या सहकार्याने ‘संडे ऑन सायकल’ हा उपक्रम नेरूळ येथील डॉ.डी.वाय. पाटील स्टेडियम येथे आयोजित करण्यात येणार आहे.
13 एप्रिल 2026 रोजी निवडलेल्या 911 सहभागींचा केंद्रीय अर्थसंकल्पातील विविध क्षेत्रांवर सखोल संवाद होईल. राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील गुणवंत विद्यार्थ्यांसह हा संवाद होणार आहे.
No comments:
Post a Comment