खानवडीत ‘ज्योती-सावित्री जिल्हा परिषद शाळेचे’मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
महिलांना लोकसभेत आणि विधानसभेत आरक्षणदेण्याचा निर्णय हे महात्मा फुले यांना खरे अभिवादन
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे, दि. 11 एप्रिल (जिमाका वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना लोकसभा व विधानसभेत 33 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून तो महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्त्री-शिक्षण व महिला सक्षमीकरणाच्या विचारांना अनुरूप असून त्यांना खरी आदरांजली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांचे मुळगाव खानवडी (ता. पुरंदर) येथे पुणे जिल्हा परिषदेकडून उभारण्यात आलेल्या ‘ज्योती-सावित्री जिल्हा परिषद शाळेचे’ उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण मंत्री दादाजी भुसे, कृषि मंत्री दत्तात्रय भरणे, अल्पसंख्याक मंत्री अतुल सावे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, शिक्षण राज्यमंत्री योगेश कदम आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment