Friday, 17 April 2026

राज्यातील महिला सुरक्षेशी संबंधित शासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्थांमध्ये अधिक प्रभावी समन्वय

 महिला सुरक्षेसाठी यंत्रणा अधिक मजबूत करण्याचे


उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांचे निर्देश


· सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध करण्यासाठी मानक कार्यपद्धती तयार होणार

मुंबई, दि. १५ : राज्यातील महिला सुरक्षेशी संबंधित शासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्थांमध्ये अधिक प्रभावी समन्वय साधून महिलांना तातडीने न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. भरोसा सेल, कौटुंबिक संरक्षण अधिकारी आणि समुपदेशन केंद्र यांच्या सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी मानक कार्यपद्धती तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

महिला सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या वन स्टॉप क्रायसिस सेंटर (सखी केंद्र) तसेच शासकीय महिला आधारगृहांमधील सेवांचा, सखी केंद्रे आणि महिला आधारगृहांमधील निवारा, कायदेशीर मदत, समुपदेशन आणि कौशल्य प्रशिक्षण या सेवांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी विधानभवनात डॉ. गोऱ्हे अध्यक्षतेखाली बैठक झाली. 

या बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव बागुल, अवर सचिव शिंदे, महिला व बाल विकास विभागाचे उपायुक्त राहुल मोरे, महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेच्या अध्यक्षा शारदा साठे, स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त झेलम जोशी, स्त्री मुक्ती परिषदेच्या सदस्य तृप्ती पंचाल, केरकर, तनेजा, कोलीटकर तसेच महिला आयोगाच्या माजी सदस्या संगीता चव्हाण आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi