Saturday, 28 March 2026

मुंबईमध्ये सहकार क्षेत्रासाठी स्वतंत्र व सर्वसमावेशक सुविधा असलेले ‘सहकार भवन

 मुंबईमध्ये सहकार क्षेत्रासाठी स्वतंत्र व सर्वसमावेशक सुविधा असलेले ‘सहकार भवन’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मुंबईमध्ये सहकार क्षेत्रासाठी स्वतंत्र व सर्वसमावेशक सुविधा असलेले ‘सहकार भवन’ उभारण्याची संकल्पना साकार होत असून, त्यातून प्रशिक्षण, मार्गदर्शन व प्रशासकीय सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. या भवनात आधुनिक कॉन्फरन्स हॉल, प्रशिक्षण कक्ष आणि विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

राज्यात सहकार क्षेत्राला विशेष महत्त्व असून, विशेषतः सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी स्वतंत्र कायदेशीर तरतुदी करण्यात आल्या आहेत. गृहनिर्माण संस्थांचे कामकाज सुलभ व्हावे यासाठी शंभर टक्के डिजिटायझेशन, कार्यालयांचे विकेंद्रीकरण आणि विविध सुधारणा राबविण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi