Saturday, 28 March 2026

अभ्युदयनगरच्या धर्तीवर प्रतीक्षानगरच्या पुनर्विकासाचा आराखडा तयार करा -

 अभ्युदयनगरच्या धर्तीवर प्रतीक्षानगरच्या पुनर्विकासाचा आराखडा तयार करा

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

 

•मुंबईतील सहकार भवनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन

 

मुंबई, दि.२७ : अभ्युदयनगरच्या धर्तीवर प्रतीक्षानगरच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार करावा. येथील नागरिकांना एकत्रित घेऊन, प्रतीक्षा नगरलाही म्हाडाच्या माध्यमातून उत्तम प्रकारच्या मोठ्या घरात राहण्याचे  स्वप्न पूर्ण करण्यासाठी तात्काळ आराखडा तयार करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.मुंबईमध्ये सहकार क्षेत्रासाठी स्वतंत्र व सर्वसमावेशक सुविधा असलेले ‘सहकार भवन’ उभारण्याची संकल्पना साकार होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

विक्रोळीतील कन्नमवार नगर, येथील मुंबई हाउसिंग फेडरेशन लि. संचालित सेवा, मार्गदर्शन व प्रशिक्षण केंद्राचे दूरदृष्टीप्रणालीद्वारे उद्घाटन व प्रतीक्षानगर, सायन येथे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकार भवनाचे भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi