Tuesday, 24 March 2026

एकात्मिक आरोग्य व्यवस्था उभारण्यावर भर

 एकात्मिक आरोग्य व्यवस्था उभारण्यावर भर

आयुर्वेद आणि ॲलोपॅथी पद्धतींचा समन्वय साधून एकात्मिक आरोग्य व्यवस्था उभारण्यावर या परिषदेत विशेष भर दिला जाणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत आधुनिक व सर्वसमावेशक आरोग्य सुविधा पोहोचविण्यास मदत होणार आहे.

या व्यासपीठावर आरोग्य सेवावैद्यकीय शिक्षणसंशोधनऔषधनिर्मिती उद्योगस्टार्टअप आणि वेलनेस पर्यटन या क्षेत्रातील घटक एकत्र येणार असूननव्या कल्पना आणि सहकार्याच्या संधी निर्माण होणार आहेत. परिणामी रुग्णांना अधिक चांगल्या सुविधाडॉक्टरांना नव्या संधी आणि विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण व संशोधनाचा अनुभव मिळणार आहे.

परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी वैद्यकीय शिक्षण विभागएमएमआरडीएउद्योग विभागमुंबई महानगरपालिकाआरोग्य विभाग तसेच विविध संस्थांचे समन्वयाने नियोजन सुरू असूनही परिषद महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्राला आंतरराष्ट्रीय पातळीवर नवे स्थान मिळवून देणारी ठरणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi