ग्रामीण भागापर्यंत आधुनिक आरोग्य सेवा पोहोचविण्यास
‘पल्स वैद्यकीय परिषद’ ठरणार महत्त्वपूर्ण
- मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी
आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी चोख नियोजनाचे निर्देश
मुंबई, दि. 23 : आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ग्रामीण भागापर्यंत दर्जेदार वैद्यकीय सुविधा पोहोचविण्याच्या दिशेने महाराष्ट्राने महत्वपूर्ण पाऊल उचलले असून, ‘पल्स वैद्यकीय परिषद’ या आंतरराष्ट्रीय व्यासपीठाद्वारे राज्याच्या आरोग्य क्षेत्राला नवी दिशा मिळणार आहे. जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे २७ व २८ मार्च २०२६ रोजी आयोजित या परिषदेच्या नियोजनासाठी चोख तयारी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिले. मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
या परिषदेत विविध देशांतील नामांकित तज्ज्ञ, संशोधक, उद्योगपती आणि धोरणकर्ते सहभागी होणार असून, आरोग्य क्षेत्रातील नव्या संधी आणि तंत्रज्ञानाचा लाभ राज्याला मिळणार आहे. सुमारे ३० संस्थांसोबत सामंजस्य करार होणार असल्याने आरोग्य सेवा, संशोधन आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.
No comments:
Post a Comment