वैद्यकीय जटिल माहिती सोप्या आणि संक्षिप्त स्वरूपात मांडण्याचे महत्त्व डॉ. ए राकेश अग्रवाल यांनी अधोरेखित केले. मेघालयसारख्या राज्यांमध्ये नर्सेससाठी प्रशिक्षण देताना तांत्रिक कौशल्यांसोबत संवादकौशल्य, नेतृत्व आणि संसाधन व्यवस्थापन यांवरही भर दिला जात आहे, डॉ नयनजीत यांनी सांतिले. .
डॉ. विवेक सावजी यांनी कौशल्य विकासासाठी टप्प्याटप्प्याने प्रगती करण्याची गरज सांगितली, तर डॉ. रेखा यांनी मूल्यांकन प्रक्रियेत सुसंगती आणि पारदर्शकता राखण्यासाठी अंतर्गत समन्वयाची गरज अधोरेखित केली.
आरोग्य व्यवस्था आणि वैद्यकीय शिक्षण यांच्यात मजबूत दुवा निर्माण करण्यासाठी समुदायाधारित शिक्षण महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले. कॅनडातील अनुभवाच्या आधारे डॉ. शैला यांनी पद्धतींचे महत्त्व स्पष्ट केले.
परीक्षाकेंद्री शिक्षणात सतत आणि अभिप्रायाधारित मूल्यमापनाची गरज व्यक्त करण्यात आली. वैद्यकीय क्षेत्रातील सहानुभूती संवेदनशीलता आणि डिजिटल साक्षरता यांचा क्लिनिकल कौशल्यांसोबत समन्वय साधत शिक्षकांनी मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावावी, असा निष्कर्ष मांडण्यात आला.
डॉ संतोष झोडपे यांनी चर्चेचे सूत्रसंचालन केले. डॉ. सुधीर मेढेकर यांनी चर्चेत सहभागी झालेल्या सदस्यांचे आभार व्यक्त केले.
No comments:
Post a Comment