Saturday, 28 March 2026

मॅक्स सिटी VoW साहित्य महोत्सव’ २८-२९ मार्च रोजी

 ‘मॅक्स सिटी VoW साहित्य महोत्सव’ २८-२९ मार्च रोजी

 

मुंबई, दि. २७ : ‘मॅक्स सिटी VoW लिटरेचर फेस्टिव्हल’ची दुसरी आवृत्ती येत्या २८ व २९ मार्च रोजी मुंबईत नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट आणि होमी भाभा स्टेट यूनिव्हर्सिटी येथे आयोजित करण्यात आले आहे. ‘Between War and Peace: One World, Many Words’ या विषयावर आधारित या महोत्सवात लेखक, अभ्यासक, धोरणनिर्माते तसेच रणनीती व प्रशासन क्षेत्रातील तज्ज्ञ एकत्र येणार आहेत.

 

हा वैशिष्ट्यपूर्ण साहित्य महोत्सव प्रबल दास गुप्ता, ईका बॅनर्जी, श्रीकांत केसनूर, मंगेश सावंत यांनी ‘MaxCity’च्या माध्यमातून स्थापन केला असून Valley of Words Foundation चे प्रमुख डॉ. संजीव चोप्रा यांच्या सहकार्याने हा महोत्सव आयोजित केला जात आहे. अस्थिर जागतिक परिस्थितीत समकालीन विषयांवरील सार्वजनिक चर्चेचे महत्त्व अधोरेखित करणे हा महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. यंदाच्या ‘One World, Many Words’ या संकल्पनेतून वर्तमान आणि भविष्य घडवण्यात विचारांची भूमिका अधोरेखित करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi