Friday, 27 March 2026

पश्चिम नागपूर, पोद्दारेश्वर राम मंदिराच्या शोभायात्रांना उपस्थिती

 पश्चिम नागपूरपोद्दारेश्वर राम मंदिराच्या शोभायात्रांना उपस्थिती

नागपूरदि. 26 : समाजात सर्व प्रकारचे आदर्श प्रस्थापित करण्याचे कार्य प्रभू श्रीरामचंद्र यांनी केले. त्यामुळेच श्रीराम हे आपल्या सर्वांच्या जीवनाचा आदर्श असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यांनी केले.

      पश्चिम नागपूर नागरिक संघातर्फे श्रीराम नवमी निमित्त काढण्यात येणाऱ्या शोभयात्रेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

             रामनगर येथील श्रीराम मंदिर परिसरात हा कार्यक्रम झाला. समाजात समता असली पाहिजे हे प्रभू श्रीरामांनी आपल्या जीवनातून दाखवून त्याच प्रकारे कार्य केल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगतानाच उपस्थिताना श्रीराम नवमीच्या शुभेच्छा दिल्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीपालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळेआ. विकास ठाकरेखा. मायायताई इवानते यावेळी अतिथी म्हणून उपस्थित होते.

सायंकाळी मंदिरात आगमन होताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचे दर्शन घेतले. त्यानंतर अतिथींच्या हस्ते पालखी पूजन व आरती करण्यात येऊन शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी पश्चिम नागपूर नागरिक संघाचे अध्यक्ष रवी वाघमारेसरचिटणीस राजीव काळेलेमनपा स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरेयोगेश पाचपोरअनिरुद्ध पालकरप्रवीण महाजन प्रभृती उपस्थित होते.

        पोद्दारेश्वर राम मंदिर

नागपूर नगरीचे ठळक वैशिष्ट्य असलेल्या पोद्दारेश्वर राम मंदिरातर्फे काढण्यात येणाऱ्या शोभयात्रेतही मुख्यमंत्री फडणवीस सहभागी झाले होते.  या शोभायात्रेचे यंदा साठावे वर्ष आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीपालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेखा. मायाताई इवानतेआ. प्रवीण दटकेमहापौर नीता ठाकरेमाजी मंत्री रमेश बंगमाजी महापौर दयाशंकर तिवारीप्रा. अनिल सोले यांच्या हस्ते प्रारंभी रामलक्ष्मणसीता माई यांच्या मूर्तीची पूजा करून श्रीरामाची आरती करण्यात आली. त्यानंतर जय श्रीरामच्या जयघोषात अतिथिनी रथ ओढून शोभायात्रेचा शुभारंभ केला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi