Friday, 27 March 2026

मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी निवड चाचण्या जाहीर

  

मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी निवड चाचण्या जाहीर

 

मुंबई 26: महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत मिशन लक्ष्यवेध अंतर्गत मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी खेळाडूंची निवड प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश राज्यातील गुणवंत खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षणआवश्यक सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध करून देत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी घडवणे हा आहे.

या उपक्रमांतर्गत वेटलिफ्टिंगलॉन टेनिसशूटिंग व टेबल टेनिस या क्रीडा प्रकारांसाठी विभागीय स्तरावर निवड चाचण्या आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड प्रक्रियेदरम्यान तज्ञ प्रशिक्षकांमार्फत खेळाडूंचे कौशल्य परीक्षण करण्यात येणार असून निवड झालेल्या खेळाडूंना प्रगत प्रशिक्षण व करिअर मार्गदर्शन दिले जाणार आहे.

 निवड चाचणी तपशील पुढीलप्रमाणे :

१) वेटलिफ्टिंग

   ठिकाण : तालुका क्रीडा संकुलकोपरीठाणे

   संपर्क प्रमुख : श्रीमती हिमानी परब

   मोबाईल : ८३६९७१६०४६

   दिनांक : ०६ एप्रिल २०२६ |  वेळ : सकाळी ८.०० वा.

२) लॉन टेनिस

 ठिकाण : महाराष्ट्र स्टेट लॉन टेनिस असोसिएशनकुपरेज क्लबमुंबई

संपर्क प्रमुख : श्रीमती प्रीती टेमघरे

 मोबाईल : ९०२९२५०२६८

 दिनांक : ०७ एप्रिल २०२६ |  वेळ : सकाळी ८.०० वा.

३) शूटिंग

 ठिकाण : कामगार कल्याण मंडळदादरमुंबई

 संपर्क प्रमुख : श्रीमती नेहा साप्ते

मोबाईल : ९९६९९७२०२२

 दिनांक : ०८ एप्रिल २०२६ वेळ : सकाळी ८.०० वा.

४) टेबल टेनिस

ठिकाण : नवी मुंबई स्पोर्ट्स अँड सामाजिक विकास मंडळपनवेल

संपर्क प्रमुख : श्री. नीलकंठ आखाडे

मोबाईल : ९९६७२७७०८२

दिनांक : ०९ एप्रिल २०२६ |  वेळ : सकाळी ८.०० वा.

या निवड चाचण्यांसाठी २५ वर्षांखालील खेळाडू पात्र असूनराज्यस्तर व राष्ट्रीय स्तरावर सहभाग घेतलेला अनुभव आवश्यक आहे.

इच्छुक खेळाडूंनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावा.

ई-मेल : missionlakshvedhamumdiv@gmail.com

अर्ज लिंक : https://forms.gle/2f7ypkikdUBKNf7fA

अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३१ मार्च २०२६

अर्जासोबत जन्मदाखलाशाळा सोडल्याचे प्रमाणपत्रआधार कार्डक्रीडा कामगिरीचे प्रमाणपत्रबोनाफाईड सर्टिफिकेट व पालक संमतीपत्र जोडणे आवश्यक आहे. निवड चाचणीच्या दिवशी मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावेअसे आवाहन करण्यात आले आहे.

ही माहिती जिल्हा क्रीडा अधिकारीमुंबई शहर यांच्या कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi