Friday, 27 March 2026

प्रभु रामांच्या जन्मदिनी रामनवमीला सावनेरचा मुख्य रस्ता सौंदर्यीकरण प्रकल्प आणि

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेप्रभु राम हे आपले आदर्श आहेत. समाजात कोणी लहान मोठे नसून सर्व समान असल्याची शिकवण देऊन त्यांनी युगधर्म मांडला. त्याच प्रभु रामांच्या जन्मदिनी रामनवमीला सावनेरचा मुख्य रस्ता सौंदर्यीकरण प्रकल्प आणि रघवी समाजाचे थोर संत मौनीबाबा यांच्या आश्रमाचे बांधकाम व सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजन झाले. सावनेर मतदार संघाचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी या भागात कोल गॅसीफिकेशन प्रकल्प आणि खत प्रकल्पसाठी केंद्र व राज्य शासनाकडे सतत पाठपुरावा केला. येत्या काळात हे दोन मोठे प्रकल्प या भागात उभे राहणार असून याद्वारे जवळपास 40 हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या सर्व कामांद्वारे या भागाच्या विकासाला चालना मिळेल व हा भाग सुजलाम- सुफलाम होईलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi