Thursday, 5 February 2026

जर्मनीच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीला दिली भेट

 जर्मनीच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीला दिली भेट

 

मुंबई,दि.५ : जागतिकस्तरावर नाविन्यता परिसंस्था अधिकाधिक परस्परांशी जोडल्या जात  आहेत या पार्श्वभूमीवर जर्मनीतील कार्लस्रुहे शहराच्या (City of Karlsruhe, Germany) प्रतिनिधीमंडळाने महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीला दिलेली भेट ही महाराष्ट्र आणि जर्मनी यांच्यात नाविन्यताधारित विकासाबाबत वाढत असलेल्या सहकार्याचे द्योतक ठरली आहे.

 

        जर्मनीतील कार्लस्रुहे हे शहर अग्रगण्य तंत्रज्ञान व नाविन्यता केंद्र म्हणून ओळखले जाते. कार्लस्रुहे शहराच्या व्यवसाय विकास विभागाच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या भेटीचा उद्देश स्टार्टअप्सप्रगत उत्पादन (Advanced Manufacturing), कौशल्यविकास आणि धोरणाधारित उद्योजकता या क्षेत्रांमध्ये दीर्घकालीन सहकार्याच्या संधींचा शोध घेणे हा होता. या भेटीतील संवादादरम्यान दोन्ही भागातील स्टार्टअप परिसंस्थेच्या व्यापक चर्चा करण्यात आली. तंत्रज्ञानाधारित उद्योगवाढऔद्योगिक व उत्पादन क्षेत्रातील नाविन्यता, कौशल्यविकास तसेच उद्योजकतेसाठी सार्वजनिक धोरणांची भूमिका या विषयांवर सविस्तर विचारमंथन झाले. शाश्वततानाविन्यता प्रशासन आणि चर्चा करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi