परिषदेचा मुख्य उद्देश भारत निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगांमध्ये त्यांच्या-त्यांच्या कायदेशीर चौकटीत राहून निवडणूक प्रक्रिया व व्यवस्थापनाबाबत समन्वय (synergy) अधिक मजबूत करणे हा आहे.
परिषदेदरम्यान राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील मतदार पात्रतेसंबंधी निवडणूक कायदे, भारत निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या ECINET या डिजिटल प्लॅटफॉर्मसह तांत्रिक नवकल्पना, तसेच ईव्हीएम (EVM) यांसारख्या विषयांवर सविस्तर चर्चा सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत.
भारत निवडणूक आयोग संविधान व देशातील कायदेशीर तरतुदींनुसार मतदार यादी तयार करणे व निवडणुका पार पाडण्याचा आपला व्यापक अनुभव या परिषदेत राज्य निवडणूक आयोगांशी सामायिक करणार आहे.
राज्य निवडणूक आयोगांची स्थापना ७३ व्या व ७४ व्या घटनादुरुस्ती तरतुदींनुसार संबंधित राज्यांच्या कायद्यांद्वारे करण्यात आली असून, पंचायत व नगरपालिका संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदार यादी तयार करणे तसेच निवडणुकांचे संचालन, दिशा व नियंत्रण ही जबाबदारी राज्य निवडणूक आयोगांवर सोपवण्यात आली आहे, अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
No comments:
Post a Comment