Saturday, 14 February 2026

भायखळ्यातील गिरणी परिसरात जागतिक दर्जाचे टेक्सटाईल क्राफ्ट आणि कल्चरल म्युझियम उभारण्याला गती

 भायखळ्यातील गिरणी परिसरात जागतिक दर्जाचे टेक्सटाईल क्राफ्ट आणि

कल्चरल म्युझियम उभारण्याला गती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेला मूर्त रूप

 

मुंबई, दि. 14 : भायखळा परिसरातील ऐतिहासिक इंडिया युनायटेड गिरणी जागेवर अत्याधुनिक टेक्सटाईल, क्राफ्ट आणि कल्चरल म्युझियम प्रकल्प उभारण्याच्या कामांना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पना आणि पुढाकारातून विकसित होणारा हा प्रकल्प लवकरच प्रत्यक्षात येणार असून, या संदर्भातील सामंजस्य करार झाला आहे

मुंबईच्या समृद्ध वस्त्रोद्योग वारशाचे जतन, पुनरुज्जीवन आणि सांस्कृतिक पुनरुत्थान साधण्याचे ध्येय या भव्य प्रकल्पामागे आहे. मुंबई महानगरपालिका, नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशन (एनटीसी) आणि जिंदाल साऊथ वेस्ट (जेएसडब्लू) फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबविण्यात येत असून, सुमारे चार हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचे हे गिरणी प्रांगण जागतिक दर्जाच्या सांस्कृतिक केंद्रात रूपांतरित होणार आहे.

या प्रकल्पांतर्गत आकर्षक गॅलरी, कला स्टुडिओ, परफॉर्मन्स स्पेसेस, खुल्या जागेतील शिल्प उद्यान, रेस्टॉरंट्स व कॅफे, कार्यशाळा व कार्यक्रमांसाठी स्वतंत्र सेक्शन्स अशा बहुउद्देशीय आणि आधुनिक सुविधांचा समावेश असणार आहे. संग्रहालयाला लिव्हिंग म्युझियम म्हणून विकसित करण्यात येणार असून, जुन्या गिरणीचा ऐतिहासिक औद्योगिक वारसा जतन करत आधुनिक सांस्कृतिक वातावरणाची सांगड घातली जाणार आहे.

या प्रकल्पाचे संपूर्ण काम जेएसडब्ल्यू फाउंडेशन विनालाभ पद्धतीने करीत असून, संग्रहालयातून प्राप्त होणारे उत्पन्न देखभाल व सार्वजनिक उपक्रमांसाठी वापरले जाणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi