गावातला तरुण होईल 'पशुधन उद्योजक': पंकजा मुंडे
पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, "केवळ नोकरीच्या मागे न लागता गावातील तरुणांनी मालक बनावे, यासाठी आम्ही लवकरच 'मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना' आणत आहोत. महिलांना लखपती दीदी बनवण्यासाठी शासनाकडून शून्य टक्के व्याजावर कर्ज उपलब्ध करून देत आहे." तसेच पशुसंवर्धनाला कृषीचा दर्जा देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे. हा दर्जा दिल्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांचे मंत्री मुंडे यांनी आभार मानले.
माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी बीड व परळीच्याश्र विकासासाठी कायम निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री यांचे आभार मानले.
No comments:
Post a Comment