Saturday, 28 February 2026

शासन प्रत्येक जिल्ह्यात सक्षम आरोग्य यंत्रणा उभारण्याच्या दिशेने कार्यरत असून महामार्गांवरील

 राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवड येथे ७०० बेड क्षमतेचे नवीन रुग्णालय उभारण्याचे काम सुरू आहे. पुणे आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध असल्याने इतर भागांतील रुग्ण उपचारासाठी येथे येतात. या शहरांनी आता ‘मेडिकल टुरिझम’चे केंद्र म्हणूनही स्थान मिळवले आहे.

शासन प्रत्येक जिल्ह्यात सक्षम आरोग्य यंत्रणा उभारण्याच्या दिशेने कार्यरत असून महामार्गांवरील रुग्णालयांच्या मागणीबाबत लवकरच बैठक घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी १०० बेड क्षमतेचे ‘क्रिटिकल केअर ब्लॉक्स’ उभारले जात आहेत. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील मल्टीस्पेशालिटी रुग्णालयांना सक्षम करण्याचे काम सुरू आहे, जेणेकरून जिल्ह्यांतून मोठ्या शहरांकडे रुग्ण पाठविण्याची  गरज भासणार नाही, असेही राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.

या लक्षवेधीच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सिद्धार्थ शिरोळे, बाबासाहेब देशमुख, योगेश सागर, अमित देशमुख, दिलीप लांडे यांनी सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi