Saturday, 28 February 2026

पर्यटनाला चालना देण्यासाठी व्याघ्र सफारी तसेच विविध भागांत बिबट सफारी सुरू करण्याचा

 पर्यटनाला चालना देण्यासाठी व्याघ्र सफारी तसेच विविध भागांत बिबट सफारी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी संबंधित विभागांना जागा निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

बिबट सफारी प्राधान्याने सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. यामुळे वन्यजीवांचे संरक्षण होईल आणि मानव–प्राणी संघर्ष कमी करण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पुणे व अहमदनगर जिल्ह्यात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर विशेष बैठक घेण्यात आली. नगर जिल्ह्यात दोन ठिकाणी बिबट हल्ल्यात मृत्यू झाल्यास २५ लाख रुपयांची मदत दिली जाते. मात्र “जीव अमूल्य आहे; नुकसानभरपाईपेक्षा अशा घटना टाळणे महत्त्वाचे,” असे नाईक यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi