Sunday, 8 February 2026

खरीप हंगाम २०२५-२६ अंतर्गत धान खरेदी योजना प्रभावीपणे राबविण्यास राज्य शासन कटिबद्ध - अग्रिम निधी वितरित

 खरीप हंगाम २०२५-२६ अंतर्गत धान खरेदी योजना

प्रभावीपणे राबविण्यास राज्य शासन कटिबद्ध अग्रिम निधी वितरित

 

मुंबईदि ७ राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला किमान आधारभूत किंमत (MSP) मिळावी व बाजारभावातील चढ-उतारापासून संरक्षण मिळावेयासाठी खरीप हंगाम २०२५-२६ अंतर्गत धान खरेदी योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या धान्याचा मोबदला वेळेत अदा करता यावायासाठी राज्य शासनामार्फत संबंधित खरेदी संस्थांना अग्रिम निधी वितरित करण्यात आला असल्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने कळविले आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघमहाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महासंघ तसेच जिल्हास्तरीय सहकारी संस्था यांच्या माध्यमातून जिल्हानिहाय अधिकृत खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली असूननिर्धारित गुणवत्ता निकषांनुसार भातमका व ज्वारी खरेदी केली जात आहे. शेतकऱ्यांची नोंदणीधान्याची गुणवत्ता तपासणीअधिकृत वजन आणि हमीभावानुसार थेट बँक खात्यात देयक जमा करण्याची पारदर्शक प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi