Tuesday, 24 June 2025

मुलुंड येथील मुलींच्या शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेस सुरुवात

 मुलुंड येथील मुलींच्या शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेस सुरुवात

    मुंबई, दि. २३ : मुलुंड येथील मुक्ता साळवे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह येथे सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाकरिता रिक्त जागेवर प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. इच्छुक विद्यार्थिनींनी कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत प्रवेशासाठी संपर्क साधावा,असे आवाहन वसतिगृहाचे गृहपाल यांनी केले आहे.

     प्रवेशित विद्यार्थिनींना वसतिगृहात राहण्याची व्यवस्था, भोजन, रुपये ९००-मासिक निर्वाह भत्ता, स्टेशनरी रक्कम, ग्रंथालय सुविधा, दैनंदिनी वर्तमानपत्र इत्यादी मोफत सोयी-सुविधा दिल्या जातात. प्रवेशासाठी विहित पात्रता आवश्यक आहे. या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशाची प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने होणार असून, वसतिगृह प्रवेशाचा अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार आहे. तरी विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर आपला अर्ज करावा.

या वसतिगृहात ११ वी व आय. टी. आय.  अभ्यासक्रमाच्या विदयार्थिनींना प्रवेश दिला जाईल. प्रवेशासाठी ५५ टक्केपेक्षा जास्त गुण असावेत. विद्यार्थीनी महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी. गृहपाल, मुक्ता साळवे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, डी-१० पार्श्वनाथ कॉ. हौसिंग सोसायटी, सर्वोदय नगर मुलुंड, मुंबई-४०००८० येथे हे वसतिगृह आहे.

****

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi