Tuesday, 24 June 2025

नोकरी करणाऱ्या महिलांना शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 नोकरी करणाऱ्या महिलांना शासकीय वसतिगृहात

प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबईदि. २३ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त महानगरात नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांसाठी शासकीय वसतिगृह सुरू करण्यात आले आहेत. बोरिवली येथील शासकीय वसतिगृहात नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांना प्रवेश देण्यास सुरुवात झाली आहे. या वसतिगृहात सन २०२५-२६ वर्षाकरिता प्रवेश घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन व्यवस्थापकशासकीय वसतिगृह, बोरिवली यांनी केले आहे.

    या वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या महिला या महाराष्ट्राच्या रहिवासी आणि अनुसूचित जातीअनुसूचित जमातीविमुक्त जातीभटक्या जमातीइतर मागास प्रवर्गविशेष मागास प्रवर्गअनाथ या प्रवर्गातील असाव्यात. तसेच अर्जदार महिलेचे मासिक उत्पन्न ३० हजारांपेक्षा जास्त नसावे. अधिक माहितीसाठी   सहायक आयुक्तसमाज कल्याणमुंबई उपनगरप्रशासकीय इमारत४ था मजलाआर. सी. मार्गचेंबूर(पू) मुंबई-७१ या कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावाअसे व्यवस्थापक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi