Friday, 14 February 2025

नोकरी करणाऱ्या महिलांना शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 नोकरी करणाऱ्या महिलांना शासकीय वसतिगृहात

प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

मुंबईदि. १४ : नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांच्या बोरिवली येथील शासकीय वसतिगृहात प्रवेश देण्यास सुरुवात झाली आहे. या वसतिगृहात  सन २०२४-२५ वर्षाकरिता प्रवेश घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन बोरिवली येथील शासकीय वसतीगृहाच्या व्यवस्थापक यांनी केले आहे.

    या वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या महिला या महाराष्ट्राच्या रहिवासी आणि अनुसूचित जातीअनुसूचित जमातीविमुक्त जातीभटक्या जमातीइतर मागास प्रवर्गविशेष मागास प्रवर्गअनाथ या प्रवर्गातील असाव्यात. तसेच अर्जदार महिलेचे मासिक उत्पन्न ३० हजारांपेक्षा जास्त नसावे. अधिक माहितीसाठी   सहायक आयुक्तसमाज कल्याणमुंबई उपनगरप्रशासकीय इमारत४ था मजलाआर. सी. मार्गचेंबूरमुंबई-७१ या कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावाअसे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

****

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi