Friday, 14 February 2025

ग्रामीण डाक सेवक पदाची २१ रिक्त पदे भरली जाणार; इच्छुक उमेदवारांनी ३ मार्च पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन Pl share

 ग्रामीण डाक सेवक पदाची २१ रिक्त पदे भरली जाणार;

इच्छुक उमेदवारांनी ३ मार्च पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

मुबंईदि. १४ : भारतीय डाक विभागामार्फत अधीक्षक डाकघरनवी मुंबई विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण डाक सेवक पदासाठी (२१ रिक्त पदे) भरली जाणार आहेत.  पात्र व इच्छुक उमेदवारांनी  ०३ मार्च२०२५ पर्यंत व त्यापूर्वी https://indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळावर

ऑनलाईन अर्ज करावेअसे आवाहन नवी मुंबई विभाग, वाशीचे वरिष्ठ अधीक्षक डाकघर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

 

 उमेदवाराने अर्ज ऑनलाईन पद्धतीद्वारे करणे आवश्यक आहे. कोणत्याही अन्य माध्यमाद्वारे आलेले व व्यक्तिश: आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अधिसूचने मध्ये नमूद केलेल्या सूचनांनुसार शुल्क भरणे आवश्यक आहे.

 

पोस्ट विभाग उमेदवारांना कोणताही फोनकॉल करत नाही. संबंधित प्राधिकरणाद्वारेच  उमेदवारांशीपत्रव्यवहारकेला जातो. उमेदवारांनी त्यांची वैयक्तिक माहितीनोंदणी क्रमांकमोबाईल क्रमांकईमेल आयडी इतरांसमोर उघड करू नयेत आणि कोणत्याही अवैध फोन कॉल्सपासून सावध राहावेअधिक माहितीसाठी www.indiapostgdsonline.gov.in संकेस्थळास भेट द्यावी. नियम व अटी वरील संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi