Sunday, 21 May 2023

स्त्री शक्ती समाधान शिबिरात 112 तक्रारींचे निराकरण

 स्त्री शक्ती समाधान शिबिरात112 तक्रारींचे निराकरण

स्त्री शक्ती समाधान शिबिरात

112 तक्रारींचे निराकरण

           मुंबई,दि.20: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (शासन आपल्या दारी) कार्यक्रमात आज मुलुंड पश्चिम टी वॉर्ड येथे 140 तक्रारी प्राप्त झाल्या तर त्यामधील112 तक्रारी जागीच  निकाली काढण्यात आल्या.  प्राप्त तक्रारी तातडीने सोडविण्याचे आदेश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.

          यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी कार्यक्रमाला  उपस्थित होते. कार्यक्रमात महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच बँका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांच्या  स्टॉलमध्ये शासनाच्या विविध विभागांकडून महिलांकरिता राबविण्यात येणा-या योजनांची माहिती  महिलांना देण्यात आली.      

          पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (शासन आपल्या दारी) कार्यक्रमात महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही  करता येणार आहे. हा उपक्रम  ३१ मे २०२३ पर्यंत   दुपारी ३ ते 5.30 वाजता  सूरू राहणार आहे.अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी https://forms.gle/7GzCSACLYsj38amq9 या लिंकवर भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi