Wednesday, 3 November 2021

 कामगारांची नोंदणी, नुतनीकरण वेळेत पूर्ण करावे;

 लाभ वाटपाचे अर्ज त्वरित निकाली काढावेत

-मंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

 

                                                                                 ·         लाभार्थींना 7.34 कोटी रूपये वाटप

                                                           

        मुंबई, दि. 2 : इमारत व इतर बांधकामांवर काम करणाऱ्या बांधकाम कामगारांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी, नुतनीकरण विहित वेळेत पूर्ण करावे तसेच लाभ वाटपांबाबतचे अर्ज तत्काळ निकाली काढण्याचे निर्देश कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाला दिले आहेत.

            महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांना देण्यात येत असलेल्या ऑनलाईन सुविधांसंदर्भात आढावा बैठक झाली.

            कामगार मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिलेल्या निर्देशानंतर कामगार विभागातील सर्व विभागीय कार्यालये व जिल्हा कार्यालयात दिनांक 28 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2021 या कालावधीत शिबीरांचे आयोजन करून मोठ्या प्रमाणावर प्रलंबित अर्ज निकाली काढण्यात आले. या चार दिवसात 55 हजार बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात आली तर एक हजार 200 कामगारांचे नूतनीकरण करण्यात आले. यापैकी 8 हजार 825 लाभार्थींचे अर्ज मंजूर करून त्यांना 7 कोटी 34 लाख 21 हजार 832 रूपये वाटप करण्यात आले आहे.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi