Friday, 19 April 2019

नोंदणीकृत धर्मादाय रुग्णालयांकडून गरीब व दुर्बल रुग्णांवर केलेल्या उपचारांची गुणवत्ता, आकारलेले दर इत्यादी बाबींची माहिती


महाराष्ट्र विश्वस्त कायद्यांतर्गत नोंदणीकृत धर्मादाय रुग्णालयांकडून गरीब व दुर्बल रुग्णांवर केलेल्या उपचारांची गुणवत्ता, आकारलेले दर इत्यादी बाबींची तपासणी करण्यासाठी तज्ञ डॉक्टरांची समिती नियुक्ती करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन
विधी व न्याय विभाग
शासन निर्णय क्रमांक : बीपीटी-२०१२/प्र.क्र. ७८/१२/का.१५
मादामा कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  मंत्रालय,
मुंबई-४०० ०३२, दिनांक : २८ मे, २०१८
प्रस्तावना :-
महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम,१९५० मधील कलम ४१ कक मधील तरतुदीअंतर्गत मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी मंजूर केलेल्या योजनेनुसार धर्मादाय रुग्णांलयामध्ये एकूण कार्यान्वित असलेल्या खाटांच्या संख्येपैकी निर्धन रुग्णांसाठी १० टक्के खाटा मोफत वैद्यकीय उपचाराकरिता व दुर्बल घटकातील रुग्णांसाठी १० टक्के खाटा सवलतीच्या दराने वैद्यकीय उपचाराकरिता आरक्षित ठेवणे बंधनकारक आहे. तथापि, सदर योजनेची राज्यातील धर्मादाय रुग्णालयांकडून अंमलबजावणी योग्य प्रकारे होत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर शासनास प्राप्त होत असतात. तसेच विधीनमंडळामध्येही सदर विषय वेळोवेळी उपस्थित केला जातो. त्याअनुषंगाने धर्मादाय रुग्णालयांकडून योजनेची योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्यात येत आहे किंवा कसे याबाबतची तपासणी करण्यासाठी तज्ञ डॉक्टरांची समिती गठित करण्याची बाब शासनाचे विचाराधीन होती. या संदर्भात शासनाने आता पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.
शासन निर्णय :
          महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० मधील कलम ४१कक मधील तरतुदीअंतर्गत मा. उच्च न्यायालय,मुंबई यांनी मंजुर केलेल्या योजनेनुसार धर्मादाय रुग्णांलयाकडून गरीब व दुर्बल घटकातील रुग्णावर उपचार करताना येणा­या अडचणी, रुग्णावर केलेल्या उपचाराची गुणवत्ता, उपचारासाठी आकारण्यात येणारे दर, औषधांचे दर या अनुषंगिक इतर सर्व महत्वाच्या बाबींची तपासणी करण्यासाठी खालीलप्रमाणे तज्ञ डॉक्टरांची समिती गठीत करण्यात येत आहे.
          १)        डॉ. तात्याराव लहाने                        -         अध्यक्ष
          २)        डॉ. अनिरुध्द्‌ धर्माधिकारी                    -         सदस्य
          ३)        डॉ. संजय ओक                            -         सदस्य
          ४)        डॉ. प्रमोद लेले                             -         सदस्य
          ५)        डॉ. निलिमा क्षिरसागर                       -         सदस्या
          ६)        डॉ. अनंत फडके                            -         सदस्य
२.        सदर समिती धर्मादाय रुग्णालयांकडून निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांवर योजनेनुसार उपचार करण्यासाठी खाटा राखून ठेवण्यात येतात किंवा कसे, रुग्णांस दाखल करुन घेतल्यानंतर रुग्णांच्या आजारानुसार त्यांच्यावर करण्यात येणारे उपचार, त्याची आवश्यकता, त्याची गुणवत्ता व दर्जा तसेच रुग्णांवर करण्यांत आलेल्या चाचण्याचे दर, उपचाराचे शुल्क, औषधांचे दर इत्यादी महत्वाच्या बाबींसाठी आकारण्यात आलेले दर उचित व योग्य होते किंवा कसे यांची तपासणी करुन तपासणीचा त्रैमासिक शिफारस वजा अहवाल धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे पाठवून त्याची एक प्रत शासनास उपलब्ध करुन देतील.
३.        धर्मादाय आयुक्त तज्ञ डॉक्टरांच्या समितीच्या शिफारस अहवालाच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करुन त्यांच्या शिफारसीसह उचित प्रस्ताव शासनास सादर करतील.
४.        तज्ञ डॉक्टर समितीच्या धर्मादाय रुग्णालयाच्या तपासणीसाठी धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी नियुक्ती केलेला प्रतिनिधी समितीस आवश्यक ती मदत व सहाय्य करतील.
          महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
                                                                                                                                                (सु.सो. शिंदे)
                                                        विधी सल्लागार नि सहसचिव.
                                                            विधी व न्याय विभाग





(उर्वरीत यादी उद्याच्या लेखात)

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi