तोंडाचे विकार
कारणे :
जागरण करणे, जास्त तिखट खाणे,
पोट साफ नसणे, पित्त होणे, अपचन होणे, उष्णता वाढणे, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे,
व्यसन करणे.
उपाय :
१) जेवणात गाईचे तूप व ताक घ्या.
२) गुलकंद खा.
३) जेष्ठमधाची कांडी चघळावी.
४) दुधाची साय आणि शंखजीरे मिक्स करुन तोंडातून
लावा.
५) हलका आहार घ्या.
६) वरील कारणे कमी करा. त्रिफळा चूर्ण घेऊन पोट
साफ ठेवा.
७) दही उष्ण असल्याने जास्त खाऊ नका.
८) जाईची पाने किंवा तोंडलीची पाने किंवा पेरुची
पाने किंवा उंबराची कोवळी कांडी चावून थुंका.
९) नियमित प्राणायम करा.
१०) आवळा पदार्थ खा.
११) एकाचवेळी सर्व उपाय करु नका.
जीभेची साले निघत असल्यास उपाय :
१) पुदिन्याची पाने आणि खडीसाखर मिक्स करुन चावून
थुंकत रहा.
२) एक केळ गाईच्या दुधाबरोबर खावे
३) त्रिफळाच्या काड्याने गुळण्या करा. जंतुसंसर्ग
कमी होतो.
आरोग्य संदेश :
व्यायामानेच
पचनशक्ती वाढवा
काळ्या द्राक्षांचे १० फायदे :
१) डायबिटीस, ब्लड प्रेशरवर नियंत्रण
काळी द्राक्ष
नियमित खाल्यामुळे डायबिटीस आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहत. काळ्या द्राक्षामध्ये
रेसवटॉल नावाचा पदार्थ असतो, ज्यामुळे रक्तात इन्सुलिन वाढत. ही द्राक्ष खाल्यामुळे
शरिरातील रक्त वाढायलाही मदत होते, त्यामुळे ब्लड प्रेशरचा त्रास होत नाही.
२) एकाग्रता वाढायला मदत
काळी द्राक्ष खाल्यामुळे एकाग्रता आणि स्मरणशक्ती
वाढायला मदत होते. तसच मायग्रेनसारखा आजारही या द्राक्षांमुळे बरा होतो.
३) हार्ट अॅटॅकचा धोका कमी
काळ्या द्राक्षांमध्ये सायटोकेमिकल्स
असतात जे हृदयाला स्वस्थ ठेवतात. तसेच या द्राक्षांमुळे कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात राहत,
ज्यामुळे हार्ट अॅटॅकचा धोका कमी होतो.
४) वजन कमी होते
नियमित काळी द्राक्ष खाल्ली तर वजन कमी होऊ
शकत. यामध्ये असणारा एँटीऑक्साईड शरिरात जास्तीचा असलेल टॉक्सिन्स बाहेर काढायला मदत
करता. ज्यामुळे वजन कमी होत.
अस्थमा बरा होतो.
काळी द्राक्ष शरिरात असलेला बॅक्टेरिया आणि
फंगसला मारायच काम करतात, जी इंफेक्शन तयार करतात. पोलिओविरुध्द् लढण्यासाठीही द्राक्ष
हा चांगला उपाय आहे. काळ्या द्राक्षामुळे अस्थमा बरा व्हायला मदत होते.
कॅन्सरला रोखा
काळी द्राक्ष
खाल्यामुळे बेस्ट, लंग, प्रोस्टेट आणि आंतड्याच्या कॅन्सरच्या धोक्यापासून वाचता येऊ
शकत.
अपचन होत नाही.
काळ्या द्राक्षांमध्ये शुगर, ऑरगॅनिक अॅसिड
आणि पोलीओस जास्त प्रमाणात असल्यामुळे अपचन आणि पोटाची जळजळ होत नाही.
डोळ्यांसाठी गुणकारी
दृष्टी सुधारण्यासाठीही काळी द्राक्ष गुणकारी
आहेत.
सुरकुत्या होतात
कमी
काळ्या द्राक्षांमुळे डोळ्यांखाली होणारा काळा
भाग कमी करतो. तसच त्वचेवर पडणाया सुरकुत्याही यामुळे कमी होतात.
केस गळती थांबावयाला मदत
काळ्या द्राक्षांमध्ये असलेल्या विटॅमिन इ
मुळे केस गळण, केस पांढरे होण यासारख्या समस्या दूर होतात. द्राक्ष खाल्यान केसांच्या
मुळापर्यंत रक्त पोहोचायला मदत होते, त्यामुळे केस मुलायम आणि मजबूत होतात.
No comments:
Post a Comment