OBC कृति समिती के लंबित प्रस्तावों की त्रुटियां दूर कर एनसीबीसी दिल्ली भेजने का सचिव श्री आप्पासो धुलाज ने दिया आश्वासन, मंत्रालय में ओबीसी कृति समिती के प्रस्ताव पर गंभीर चर्चा सफल
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Friday, 9 October 2026
OBC कृति समिती के लंबित प्रस्तावों की त्रुटियां दूर कर एनसीबीसी दिल्ली भेजने का सचिव श्री आप्पासो धुलाज ने दिया आश्वासन, मंत्रालय में ओबीसी कृति समिती के प्रस्ताव पर गंभीर चर्चा सफल
महामंडळाच्या राज्यभरातील सुमारे ८५० ठिकाणीजमिनींचा व्यापारी, निवासी, औद्योगिक तसेच अन्य व्यावसायिक कारणांसाठी नियोजनबद्ध विकास
महामंडळाच्या राज्यभरातील सुमारे ८५० ठिकाणी ३५०० एकरांपेक्षा अधिक जमीन उपलब्ध आहे. यातील मोठ्या प्रमाणातील जमीनी मोक्याच्या ठिकाणी आहे.
या जमिनींचा व्यापारी, निवासी, औद्योगिक तसेच अन्य व्यावसायिक कारणांसाठी नियोजनबद्ध विकास केल्यास महामंडळाला आगावू प्रीमियम सह मोठ्या प्रमाणावर नियमित उत्पन्न मिळू शकते. तसेच व्यवसायिक संकुलात देखील महामंडळाला हिस्सा मिळणार असल्याने त्यातून नियमित वार्षिक उत्पन्न देखील महामंडळाला प्राप्त होणार आहे.
याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “एसटी महामंडळाच्या मालकीच्या जमिनी हा महामंडळाचा मौल्यवान ठेवा आहे. या जमिनींचा विनियोग केवळ तात्पुरत्या उत्पन्नासाठी नव्हे, तर एसटीच्या दीर्घकालीन आर्थिक सक्षमीकरणासाठी करण्यात येणार आहे. पारदर्शक निविदा प्रक्रिया, योग्य व्यावसायिक नियोजन आणि पीपीपी तत्वाच्या माध्यमातून या मालमत्तेतून महामंडळाला अधिकाधिक उत्पन्न मिळवून देणे हा आमचा प्रमुख उद्देश आहे.”
“एसटीच्या प्रवासी सेवेला अधिक सक्षम करण्यासाठी आर्थिक स्वावलंबन आवश्यक आहे. त्यामुळे महामंडळाच्या अतिरिक्त जमिनींचा योग्य पद्धतीने विकास करून त्यातून मिळणारे उत्पन्न एसटीच्या सेवा-सुविधांच्या बळकटीकरणासाठी उपयोगात आणले जाईल,” असेही मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.
मुंबईत ‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षांनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
मुंबईत ‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षांनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
१४ ऑक्टोबर रोजी रवींद्र नाट्य मंदिरात विशेष सांस्कृतिक सादरीकरण; रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य
मुंबई, दि. ९ : ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या १५० वर्षपूर्तीनिमित्त विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन बुधवार, दि. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने साहित्य अकादमी (राष्ट्रीय साहित्य संस्थान), संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
‘वंदे मातरम्’ हे गीत भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील प्रेरणादायी प्रतीक असून, या गीताने देशवासीयांमध्ये राष्ट्रप्रेम आणि स्वातंत्र्याची भावना जागृत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या गीताच्या १५० वर्षपूर्तीनिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमातून त्याचा ऐतिहासिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक वारसा अधोरेखित करण्यात येणार आहे.
साहित्य अकादमी ही संस्कृती मंत्रालय, भारत सरकारच्या अंतर्गत कार्यरत स्वायत्त साहित्य संस्था असून, साहित्य आणि भारतीय भाषांच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून साहित्य आणि संस्कृती यांचा संगम घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून, तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. भारतीय सांस्कृतिक वारसा, साहित्य आणि राष्ट्रप्रेरणेशी निगडित कलाकृतींचा प्रसार करण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून, काही जागा राखीव आहेत. मुंबईतील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे
गावातील यात्रा आणि उत्सव हे त्या गावाच्या सांस्कृतिक ओळखीचे
गावातील यात्रा आणि उत्सव हे त्या गावाच्या सांस्कृतिक ओळखीचे अविभाज्य अंग असतात. या उत्सवांमधून पारंपरिक कला, नृत्य, संगीत आणि लोकजीवनाचे विविध पैलू पुढील पिढीपर्यंत पोहोचतात. यात्रांच्या माध्यमातून गावातील नागरिक एकत्र येतात, सामाजिक संबंध दृढ होतात आणि सामूहिक सहभागाची भावना वाढीस लागते. या परंपरांचे दस्तऐवजीकरण आणि अभ्यास झाल्यास महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे जतन अधिक प्रभावीपणे करता येईल, असेही त्यांनी नमूद केले.
यात्रा-उत्सवांचा संबंध केवळ श्रद्धा आणि परंपरेपुरता मर्यादित नसून, त्यातून स्थानिक कलाकार, कारागीर, लघुव्यावसायिक आणि विविध सेवा पुरविणाऱ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळते. स्थानिक कला आणि कलाकृतींना प्रोत्साहन देत या परंपरांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्राच्या विविध भागांतील यात्रा, उत्सव आणि सांस्कृतिक परंपरांची माहिती संकलित करणारे हे ग्रंथ संशोधक, अभ्यासक, विद्यार्थी आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरतील. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे दस्तऐवजीकरण करून ते पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने या प्रकाशनाला विशेष महत्त्व आहे.
गावच्या यात्रा-उत्सव ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख
गावच्या यात्रा-उत्सव ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख
- सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार
मुंबई, दि. ९ : गावोगावी साजऱ्या होणाऱ्या यात्रा आणि उत्सव हे केवळ धार्मिक किंवा मनोरंजनाचे कार्यक्रम नसून, ते महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे, सामाजिक एकतेचे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. गावातील देवदेवता, लोककला, नृत्य, संगीत, परंपरा आणि सामूहिक सहभाग यांमधून ग्रामीण समाजाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध होत असते. या परंपरांचे जतन करतानाच गावांचा सर्वांगीण विकास आणि आधुनिक व्यवस्थांचे बळकटीकरण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या दर्शनिका विभागामार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या ‘राज्य गॅझेटिअर’मधील ‘यात्रा व उत्सव : कोकण विभाग’, ‘यात्रा व उत्सव : पश्चिम महाराष्ट्र’ आणि ‘वैदिक जलविज्ञान’ या ग्रंथांच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त ते बोलत होते. या ग्रंथांचे प्रकाशन ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले.
गावातील यात्रा आणि उत्सव हे त्या गावाच्या सांस्कृतिक ओळखीचे अविभाज्य अंग असतात. या उत्सवांमधून पारंपरिक कला, नृत्य, संगीत आणि लोकजीवनाचे विविध पैलू पुढील पिढीपर्यंत पोहोचतात. यात्रांच्या माध्यमातून गावातील नागरिक एकत्र येतात, सामाजिक संबंध दृढ होतात आणि सामूहिक सहभागाची भावना वाढीस लागते. या परंपरांचे दस्तऐवजीकरण आणि अभ्यास झाल्यास महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे जतन अधिक प्रभावीपणे करता येईल, असेही त्यांनी नमूद केले.
यात्रा-उत्सवांचा संबंध केवळ श्रद्धा आणि परंपरेपुरता मर्यादित नसून, त्यातून स्थानिक कलाकार, कारागीर, लघुव्यावसायिक आणि विविध सेवा पुरविणाऱ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळते. स्थानिक कला आणि कलाकृतींना प्रोत्साहन देत या परंपरांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कॉमर्स कंपन्यांच्या माध्यमातून माल विकणाऱ्या लहान विक्रेत्यांसाठी सुलभ जीएसटी नोंदणीला तत्त्वतः मंजुरी देण्यात आली होती.
-कॉमर्सच्या माध्यमातून विक्री करणाऱ्या लहान विक्रेत्यांसाठी सुलभ जीएसटी नोंदणी
56व्या बैठकीत ई-कॉमर्स कंपन्यांच्या माध्यमातून माल विकणाऱ्या लहान विक्रेत्यांसाठी सुलभ जीएसटी नोंदणीला तत्त्वतः मंजुरी देण्यात आली होती.
त्याच अनुषंगाने 57व्या बैठकीत CGST Rules, 2017 मध्ये Rule 14B समाविष्ट करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
ज्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात विक्रेत्याचे प्रत्यक्ष व्यवसायस्थळ नाही आणि ज्याला दरमहा ₹2.5 लाखांपेक्षा जास्त आटीसी पुढे हस्तांतरित करायचे नाही, तो त्या राज्यातील ई-कॉमर्स कंपनीचे गोदाम आपले व्यवसायाचे मुख्य ठिकाण म्हणून घोषित करू शकेल.
अशा प्रकरणात ठरावीक अटींच्या अधीन राहून जीएसटी नोंदणी संगणकीय प्रणालीद्वारे आपोआप दिली जाईल.
यामुळे प्रत्येक राज्यात स्वतंत्र व्यवसायस्थळ उभारण्याची गरज न पडता लहान विक्रेत्यांना इतर राज्यांत ई-कॉमर्सच्या माध्यमातून व्यवसाय वाढवता येईल.
जीएसटी नोंदणीशी संबंधित सुधारणा 1\. जीएसटी नोंदणीची प्रक्रिया अधिक सोपी आणि स्पष्ट करणे
जीएसटी नोंदणीशी संबंधित सुधारणा
1\. जीएसटी नोंदणीची प्रक्रिया अधिक सोपी आणि स्पष्ट करणे
जीएसटी परिषदेच्या 56व्या बैठकीतील शिफारसीनुसार, ज्या अर्जदाराला दरमहा ₹2.5 लाखांपेक्षा जास्त कर-वजावट सवलत (आयटीसी) पुढे हस्तांतरित करायची नाही, अशा अर्जदारांना CGST Rules, 2017 मधील Rule 14A अंतर्गत कर अधिकाऱ्याच्या हस्तक्षेपाशिवाय संगणकीय प्रणालीद्वारे स्वयंचलित जीएसटी नोंदणी दिली जात आहे.
उर्वरित अर्जांची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी 57व्या बैठकीत पुढील शिफारसी करण्यात आल्या आहेत:
· जीएसटी नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे आणि माहिती यांची सविस्तर यादी असलेले परिपत्रक आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न जारी करणे.
· FORM GST REG-01 मध्ये बदल करून आवश्यक कागदपत्रे आणि माहिती निवडण्यासाठी पर्याय उपलब्ध करून देणे.
· जीएसटी संकेतस्थळावर सोपी मार्गदर्शक रचना, निवडसूची, सूचना आणि आवश्यक ठिकाणी मार्गदर्शन उपलब्ध करून देणे.
· यामुळे चुकीची किंवा अपुरी माहिती दिल्यामुळे नोंदणी अर्ज फेटाळले जाण्याचे प्रमाण कमी होईल आणि अर्जांवर जलद निर्णय घेता येईल.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...