Thursday, 30 July 2026

खेळणा मध्यम प्रकल्पाची साठवण क्षमता वाढविण्यासाठी उंची वाढवण्याबरोबरच धरणातील गाळ काढण्याचा आराखडा तयार करा

 खेळणा मध्यम प्रकल्पाची साठवण क्षमता वाढविण्यासाठी उंची वाढवण्याबरोबरच

धरणातील गाळ काढण्याचा आराखडा तयार करा

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

·         जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध सिंचन प्रकल्पांच्या कामांचा आढावा

मुंबई, दि. २९ : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील खेळणा मध्यम प्रकल्पाची साठवण क्षमता वाढविण्यासाठी धरणातील गाळ काढून तो शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावा. धरणाची उंची वाढविण्याच्या प्रस्तावासोबतच हा प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करावा. त्यामुळे प्रकल्पात अधिक पाणीसाठा निर्माण होईल आणि नवीन धरण उभारण्यासाठी लागणारा मोठा खर्चही वाचू शकतो. या दृष्टीने जलसंपदा विभागाने सविस्तर आराखडा तयार करावा, असे निर्देश जलसंपदा मंत्री ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

मंत्रालयात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील विविध सिंचन प्रकल्पांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस आमदार बबनराव लोणीकर, आमदार अब्दुल सत्तार, आमदार हिकमत उडाण, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, सहसचिव नार्वेकर तसेच गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक जयंत गवळी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत सिल्लोड तालुक्यातील खेळणा मध्यम प्रकल्पाची उंची वाढविण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. विभागाने यासाठी सुमारे २ कोटी ७४ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता दर्शविणारा आराखडा तयार केला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

याशिवाय, अजिंठा बंधाऱ्यामुळे सुमारे ७ दशलक्ष घनमीटर अतिरिक्त पाणी साठवण क्षमता निर्माण होऊ शकते, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. तापी पाटबंधारे विकास महामंडळाने राज्य जल आराखड्यात या कामासाठी २५० कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित केला आहे. तसेच पूर्णा नदीवरील दहा साखळी बंधाऱ्यांच्या कामाचाही आढावा यावेळी घेण्यात आला.

जालना जिल्ह्यातील बरबडा-आखणी लघु पाटबंधारे प्रकल्पातील भूसंपादन मोबदला प्रकरण दीर्घकाळ प्रलंबित असल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. आखणी गावाच्या पुनर्वसनाबाबत ग्रामसभेने स्वेच्छा पुनर्वसनाचा ठराव मंजूर करून पाठवल्यानंतर संबंधितांना रोख मोबदला देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

जालना जिल्ह्यातील परतूर व मंठा तालुक्यातील आंबा, वाघा, टाकळखोपा, तळणी आणि देवठाणे येथील बंधारे काही वर्षांपूर्वी फुटून झालेल्या नुकसानीच्या दुरुस्तीसाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचनाही मंत्री विखे पाटील यांनी दिल्या.

घनसावंगी तालुक्यातील साष्टे, पिंपळगाव, गुंज आणि गलाठी येथील बंधाऱ्यांमध्ये पाणी उपलब्ध होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच साठवण प्रकल्पांच्या प्रलंबित कामांचा आढावा घेऊन त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.

यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर आणि आ. अब्दुल सत्तार यांनी संबंधित प्रकल्पांची आवश्यकता अधोरेखित करून त्यावरील कार्यवाही तातडीने करण्याची मागणी केली. आमदार हिकमत उढाण यांनी घनसावंगी तालुक्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्पांबाबत माहिती दिली.

न्हावा-शेवा टप्पा-३ पाणीपुरवठा योजनेच्या कामांना गती द्या

 न्हावा-शेवा टप्पा-३ पाणीपुरवठा योजनेच्या कामांना गती द्या

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

·         एमएमआरडीए आणि एमएसआरडीसीने समन्वयातून तांत्रिक अडचणी तातडीने दूर कराव्यात

मुंबई, दि. २९ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या न्हावा-शेवा टप्पा-३ पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर असून, कोन ते पळस्पे दरम्यान जलवाहिनी टाकण्याच्या कामात येणाऱ्या तांत्रिक अडचणी एमएमआरडीए आणि एमएसआरडीसी यांनी परस्पर समन्वयातून तातडीने दूर करून कामाला गती द्यावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

मंत्रालयात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली न्हावा-शेवा टप्पा-३ पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेण्यात आला. यावेळी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील, पनवेल महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष बबन मुकादम, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अमगोथू श्रीरंगा नायक, मुख्य अभियंता तथा विशेष कार्य अधिकारी प्रशांत भामरे, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंते संजय वेंगुर्लेकर व रमेश वायदंडे, एमएमआरडीएचे प्रतिनिधी नामदेव गव्हाणे, तहसीलदार स्मिता मोहिते तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत न्हावा-शेवा टप्पा-३ पाणीपुरवठा योजनेच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पनवेल मंडळामार्फत राबविण्यात येणारी ही २२८ दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) क्षमतेची योजना असून, त्यापैकी १०० दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी पनवेल महानगरपालिकेसाठी आरक्षित करण्यात आले आहे.

योजना अद्याप पूर्णपणे कार्यान्वित न झाल्यामुळे पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पाणीटंचाईची समस्या निर्माण होत असल्याची बाब बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आली. विशेषतः कोन ते पळस्पे दरम्यान जलवाहिनी टाकण्याच्या कामात उद्भवलेल्या तांत्रिक अडचणी एमएमआरडीए आणि एमएसआरडीसी यांनी समन्वयातून तातडीने दूर कराव्यात, जेणेकरून जलवाहिनीचे काम वेगाने पूर्ण होऊन योजना लवकर कार्यान्वित होईल आणि पनवेल शहरातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा उपलब्ध होण्यास मदत होईल, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.

राज्यातील महत्त्वाच्या पाणीपुरवठा योजनांची अंमलबजावणी वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यास शासन प्राधान्य देत असून, संबंधित सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देशही मंत्री पाटील यांनी यावेळी दिले.

न्हावा-शेवा टप्पा-३ पाणीपुरवठा योजनेच्या कामांना गती द्या

 न्हावा-शेवा टप्पा-३ पाणीपुरवठा योजनेच्या कामांना गती द्या

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

·         एमएमआरडीए आणि एमएसआरडीसीने समन्वयातून तांत्रिक अडचणी तातडीने दूर कराव्यात

मुंबई, दि. २९ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या न्हावा-शेवा टप्पा-३ पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर असून, कोन ते पळस्पे दरम्यान जलवाहिनी टाकण्याच्या कामात येणाऱ्या तांत्रिक अडचणी एमएमआरडीए आणि एमएसआरडीसी यांनी परस्पर समन्वयातून तातडीने दूर करून कामाला गती द्यावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

मंत्रालयात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली न्हावा-शेवा टप्पा-३ पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेण्यात आला. यावेळी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील, पनवेल महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष बबन मुकादम, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अमगोथू श्रीरंगा नायक, मुख्य अभियंता तथा विशेष कार्य अधिकारी प्रशांत भामरे, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंते संजय वेंगुर्लेकर व रमेश वायदंडे, एमएमआरडीएचे प्रतिनिधी नामदेव गव्हाणे, तहसीलदार स्मिता मोहिते तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत न्हावा-शेवा टप्पा-३ पाणीपुरवठा योजनेच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पनवेल मंडळामार्फत राबविण्यात येणारी ही २२८ दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) क्षमतेची योजना असून, त्यापैकी १०० दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी पनवेल महानगरपालिकेसाठी आरक्षित करण्यात आले आहे.

राज्यातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित व शाश्वत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने

 राज्यातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित व शाश्वत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या योजनांची गुणवत्ता आणि वेळेत अंमलबजावणी यावर विशेष भर देण्यात येत असून, प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असेही मंत्री पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांचा आढावा

 मंत्रालयात मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार रोहित आर. आर. पाटील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अमगोथू श्रीरंगा नायक, पाणीपुरवठा विभागाच्या सहसचिव गीता कुलकर्णी, मुख्य अभियंता तथा विशेष कार्य अधिकारी प्रशांत भामरे, सांगली जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता सोनल पाटील तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सांगली कार्यालयाचे कार्यकारी अभियंता अमित आडे उपस्थित होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सांगलीच्या मुख्य अभियंता वैषाली आवटे या दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाल्या.

बैठकीत सांगली जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील ज्या पाणीपुरवठा योजनांची अंदाजित किंमत ₹५० लाखांपर्यंत आहे, अशा सर्व योजनांना आयुक्त स्तरावर तातडीने मान्यता देण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्री पाटील यांनी दिल्या.

तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांना गती द्या –

 तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांना गती द्या

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

·         नेहरूनगर योजनेचा नव्याने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

मुंबई, दि. २९ : सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील निमणी, बेंद्री, नागाव (नि), शिरगाव (कवठे) आणि नेहरूनगर या गावांसाठी जलजीवन मिशनअंतर्गत स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. यापैकी बेंद्री आणि शिरगाव (कवठे) येथील योजनांची कामे पूर्ण झाली असून निमणी आणि नागाव (नि) येथील कामे प्रगतीपथावर आहेत. नेहरूनगर येथील योजनेचे जलस्रोत निकामी झाल्यामुळे काम पूर्ण होऊ शकले नसल्याने या गावासाठी नव्याने प्रस्ताव सादर करण्यात यावा, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

Featured post

Lakshvedhi