Thursday, 30 July 2026

तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांचा आढावा

 मंत्रालयात मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार रोहित आर. आर. पाटील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अमगोथू श्रीरंगा नायक, पाणीपुरवठा विभागाच्या सहसचिव गीता कुलकर्णी, मुख्य अभियंता तथा विशेष कार्य अधिकारी प्रशांत भामरे, सांगली जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता सोनल पाटील तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सांगली कार्यालयाचे कार्यकारी अभियंता अमित आडे उपस्थित होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सांगलीच्या मुख्य अभियंता वैषाली आवटे या दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाल्या.

 

बैठकीत सांगली जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील ज्या पाणीपुरवठा योजनांची अंदाजित किंमत ₹५० लाखांपर्यंत आहे, अशा सर्व योजनांना आयुक्त स्तरावर तातडीने मान्यता देण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्री पाटील यांनी दिल्या.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi