Sunday, 27 September 2026

दुष्काळी परिस्थितीत शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱी मदतीच्या केंद्रस्थानी* *दुष्काळावर मात करण्यासाठी एकजूटीने प्रयत्न - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार*

 दुष्काळी परिस्थितीत शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱी मदतीच्या केंद्रस्थानी*


*दुष्काळावर मात करण्यासाठी एकजूटीने प्रयत्न - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार*

*राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर , बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार*


मुंबई, दि. २६ : - ‘दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत. आम्ही शेतकऱी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. या आव्हानावर मात करण्यासाठी आपण सर्व एकजूटीने प्रयत्न करूया, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. या तालुक्यांतील शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी बारा उपाययोजना व सवलती लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

याबाबतचा शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी या तालुक्यांमधील परिस्थितीबाबत तत्काळ पंचनामे सुरु करावेत असे निर्देश संबंधित जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.

‘पावसाअभावी शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दुष्काळी परिस्थिती जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये तत्काळ सर्व्हेक्षण करावे लागणार आहे. यासाठी महसूल विभाग, कृषि तसेच संबंधित सर्व यंत्रणांनी संवेदनशीलतेने आणि समन्वयाने काम करावे. त्यासाठी क्षेत्रीयस्तरावर सुसंवाद आणि संपर्क ठेवावा. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या कामाला प्राधान्य द्यावे, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले आहेत. सर्व्हेक्षण करताना पिकांची स्थिती दर्शवणारे छायाचित्रे व जीपीएस कोऑडीनेटद्वारे पिक परिस्थितीचा अहवाल सादर केला जाणार आहे.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नुकताच राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दौरा केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. शेतकऱी बांधवांशी आस्थेवाईक संवाद साधला. त्यांच्या अडी-अडचणी समजून घेतल्या. दुष्काळी परिस्थितीबाबत तातडीने निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासित केले होते. त्या अनुषंगाने आज दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ नुसार राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्याबाबत शासन निर्णय जाहीर करण्यात आला.


महाराष्ट्र शासनाने २७५तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिलेल्या सवलती.

 *राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; १२ महत्त्वपूर्ण . सन २०२६ च्या खरीप हंगामातील अपुरे  पाऊस ज्यामुळे पिकांची भयावह स्थिती पाहून मदत व पुनर्वसन विभागाने राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये ‘ अंतर्गत दुष्काळ जाहीर करुन. २५ सप्टेंबर २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर क्र. समिती-२०२६/प्र.क्र.८२/मदत-२) जारी करण्यात आला असून बाधित भागांसाठी १२ मोठ्या सवलती व तातडीच्या उपाययोजना लागू केल्या  आहेत.       

     तर दुसरीकडे, कोकण विभाग दुष्काळ चे सावट खाली आहे असे चित्र दिसते 

*दुष्काळग्रस्तांसाठी शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या १२ कलमी प्रमुख सवलती...*     

 * जमीन महसुलात पूर्ण सूट.

 * पिक कर्जाचे पुनर्गठन.

 * शेतीशी निगडीत सर्व प्रकारच्या कर्जवसुलीस स्थगिती.

 * कृषी पंपांच्या वीजबिलात सवलत: ७.५ हॉर्सपावरपर्यंतचे वीजबिल अगोदरच माफ असून, त्यावरील क्षमतेच्या वीजपंपांना चालू वीजबिलात विशेष सूट.

 * विद्यार्थ्यांना दिलासा: शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात संपूर्ण माफी.

 * रोजगार हमी योजना (MGNREGA): निकषांमध्ये शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे तात्काळ सुरू करण्याचे निर्देश.

 * पाणीपुरवठा: टंचाईग्रस्त भागात आवश्यकतेनुसार तातडीने पिण्याच्या पाण्यासाठी टँकर्सची सोय.

 * वीज जोडणी संरक्षण: टंचाईग्रस्त गावांमधील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज जोडणी खंडित करण्यास मनाई.

 * अन्नसुरक्षा: शेतीवर अवलंबून असणारे शेतकरी व शेतमजुरांना अन्नधान्याची टंचाई भासू नये यासाठी विशेष अन्नधान्य वितरण व्यवस्था.

 * पशुधनाचे रक्षण: जनावरांसाठी मुबलक चारा व छावण्या/व्यवस्था उभारणे.

 * जलसंधारण: टंचाई निवारणासाठी जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर सुरू करणे.

 * पाण्याचे सूक्ष्म नियोजन: शासन निर्देशांनुसार पिण्याचे पाणी व जनावरांच्या पाण्याचे काटेकोर नियोजन.

*जीपीएस आणि छायाचित्रांसह पंचनामे करण्याचे कडक आदेश...*

 २०१६ च्या निकषांनुसार, कृषी आयुक्तांच्या २४ सप्टेंबर २०२६ च्या अहवालानंतर अवघ्या २४ तासांत शासनाने हा निर्णय घेऊन शेतकरी यांना दिलासा देऊन कर्तव्य तत्परता दाखविली आहे.

       याशिवाय, प्रत्यक्ष पीक नुकसानीची आर्थिक मदत स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे लवकरच वितरित केली जाणार आहे.

, कोकणातील रायगड (१ तालुका), रत्नागिरी (३ तालुके) आणि सिंधुदुर्ग (८ तालुके) या जिल्ह्यांमधील काही भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने तिथे उपाययोजना लागू 

*राज्यातील एकूण दुष्काळग्रस्त तालुक्याची संख्या...*

     राज्यातील एकूण २६५ तालुक्यांमध्ये ही परिस्थिती असून छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, अमरावती आणि नागपूर विभागातील बहुतांश तालुक्यांचा यात समावेश आहे. बीड (११), अहिल्यानगर (१४), जळगाव (१५), यवतमाळ (१६), अमरावती (१४), नागपूर (१४), सोलापूर (११) या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर तालुके बाधित झाले आहेत.

    दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या बळीराजाला आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला शासनाने खंबीर उभे राहून शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविले.

00000000000

Saturday, 26 September 2026

विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांसाठी तज्ज्ञ समिती गठित

 विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांसाठी तज्ज्ञ समिती गठित

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

 

मुंबई, दि. २४ :  महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ तसेच विद्यार्थी परिषद निवडणुकांसंदर्भातील एकरूप परिनियमांच्या अनुषंगाने विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांसाठी  समिती गठित केली असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

 

विद्यार्थी परिषद निवडणुकांशी संबंधित विविध बाबींचा सखोल अभ्यास करून शासनाला आवश्यक त्या उपाययोजना व शिफारशी सादर करण्याची जबाबदारी समितीवर सोपविण्यात आली आहे.

या समितीच्या अध्यक्षपदी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे यांच्यासह विविध विद्यापीठे व महाविद्यालयांतील तज्ज्ञांचा समावेश असून मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे हे समितीचे सदस्य सचिव आहेत.

 

समितीमार्फत महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ आणि विद्यार्थी परिषद निवडणुकांसाठी लागू असलेल्या एकरूप परिनियमांचा सविस्तर अभ्यास करण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक, सुलभ आणि गतिमान करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना सुचविणे, निवडणूक प्रक्रियेतील विविध घटकांबाबत योग्य नियमावली निश्चित करणे आणि पुढील दिशा ठरविणे, ही समितीची प्रमुख कार्ये आहेत.

 

विद्यार्थी परिषदेमध्ये महिला, अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय तसेच इतर मागासवर्ग आणि NSS, NCC, क्रीडा व सांस्कृतिक विभागांना योग्य व प्रमाणबद्ध प्रतिनिधित्व मिळण्यासाठी धोरणात्मक शिफारसी करण्याचे निर्देशही समितीला देण्यात आले आहेत.

 

तसेच विद्यार्थी परिषद निवडणुकांमध्ये कोणत्याही स्वरूपाचा बाह्य राजकीय हस्तक्षेप अथवा निवडणुकांचे व्यापारीकरण होऊ नये, यासाठी कडक नियमावली व उपाययोजना सुचविण्यात येणार आहेत. विद्यार्थी परिषदेच्या निधी, अंदाजपत्रक व खर्चाचे व्यवस्थापन तसेच वेळेत लेखापरीक्षण पारदर्शकपणे होण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे कामही समिती करणार आहे.

 

नव्याने निवडून आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींना त्यांचे अधिकार, कर्तव्ये, कार्यपद्धती आणि विद्यापीठ अथवा महाविद्यालयीन प्रशासनाशी संबंधित बाबींची माहिती मिळावी, यासाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन राबविण्याबाबतही समिती शिफारसी करणार आहे. नामनिर्देशन, छाननी, मतदान आणि तक्रार निवारण प्रक्रियेत आवश्यकतेनुसार डिजिटल अथवा ऑनलाइन प्रणालीचा वापर करण्याबाबतही अभ्यास करून अहवाल सादर केला जाणार आहे. ही आपले निष्कर्ष व शिफारसी एक महिन्याच्या आत शासनास अहवाल सादर करेल असेही मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील प्रत्येक युवक-युवतीला त्याच्या कौशल्याला आणि पात्रतेला साजेशी रोजगाराची संधी मिळावी, हा ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ

 महाराष्ट्रातील प्रत्येक युवक-युवतीला त्याच्या कौशल्याला आणि पात्रतेला साजेशी रोजगाराची संधी मिळावी, हा ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ – महाराष्ट्र’चा मुख्य उद्देश आहे. युवकांना केवळ रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे नव्हे, तर मुलाखतीपूर्वी आवश्यक कौशल्ये व मार्गदर्शन मिळावे यासाठी प्री-प्लेसमेंट प्रशिक्षणही घेण्यात आले आहे. महिलांच्या रोजगार सहभागाला चालना देण्यासाठी एसएनडीटी महिला विद्यापीठात  फक्त महिलांसाठी विशेष रोजगार मेळावा आयोजित करण्यात येत आहे. उद्योगांच्या गरजा आणि युवकांची कौशल्ये यांची सांगड घालून महाराष्ट्रातील अधिकाधिक युवकांना रोजगाराच्या प्रवाहात आणण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे.

येत्या काळात चाराटंचाई, पाणीटंचाईबाबत उपाययोजना करून अन्नधान्याचीही मदत

 येत्या काळात चाराटंचाई, पाणीटंचाईबाबत उपाययोजना करून अन्नधान्याचीही मदत करावी लागणार आहे. शेतकऱ्यांच्या पाल्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये, यासाठी थेट मदत करण्यात येईल.

रब्बीमध्ये काही ठिकाणी उपलब्ध असलेल्या पाण्यावर पिके घेण्याबाबत तपासणी करण्यात येईल. तसेच रब्बी पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल.तसेच, रोजगार उपलब्ध होण्यासाठी जलसंधारणाच्या कामावर भर देण्यात येईल. जलसाठे आटलेले असल्यामुळे यातील गाळ काढणे, जलतारा स्ट्रक्चर निर्माण करणे, दुरुस्ती करणे आवश्यक असलेले तलाव शोधून त्यांची दुरुस्ती करण्यात येईल.

 

सर्वदूर पिकांची परिस्थिती सारखीच असल्यामुळे राज्य शासनाने मदतीचे धोरण आखले आहे. शेतकऱ्यांना करण्यात येणारी ही मदत दिवाळीपूर्वी मिळेल, याचे नियोजन केले जाईल.राज्य शासनाने कर्जमाफी केली असून कर्जाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना बँकांना नियमाप्रमाणे कर्ज द्यावेच लागेल. त्यासोबतच शेतमालाची शासकीय दराने खरेदी केली जाईल. यासाठी लवकरच नोंदणी सुरू केली जाईल.

नाशिक-कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांत ४१८ हून अधिक ठिकाणी रोजगार मेळावे · दीड हजारांहून अधिक कंपन्या व नियोक्त्यांचा सहभाग · १ लाखांपेक्षा अधिक उमेदवारांची नोंदणी, २५ हजारांहून अधिक रोजगार संधी उपलब्ध

 नाशिक व कोकण विभागात २९ सप्टेंबरला

­­‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ - महाराष्ट्र’

·         मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन

 

·         नाशिक-कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांत ४१८ हून अधिक ठिकाणी रोजगार मेळावे

·         दीड हजारांहून अधिक कंपन्या व नियोक्त्यांचा सहभाग

·         १ लाखांपेक्षा अधिक उमेदवारांची नोंदणी, २५ हजारांहून अधिक रोजगार संधी उपलब्ध

 

मुंबई,  दि. २४ : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने २९ सप्टेंबर रोजी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ मेळावा’ या रोजगार उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय 'रोजगार महाकुंभ' मेळावे निवडणुक आचारसंहिता लागू झाल्यामुळे टप्प्याटप्प्याने आयोजित करण्यात येणार आहेत. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात नाशिक आणि कोकण विभागातील रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील एसएनडीटी महिला विद्यापीठात महिलांसाठी विशेष रोजगार मेळाव्याचे उद्घाटन २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे पिकाचे

 पीक परिस्थितीचा आढावा

अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे पिकाचे नुकसान झाले असून मुगाची पेरणी ४७.८३% आणि उडदाची पेरणी ६१.४५% झाली आहे. तसेच कपाशीची ९१.६६% पेरणी झाली असून पिके पाती, फुलोरा व बोंडे धरण्याच्या अवस्थेत आहेत. पावसा अभावी  वाढ खुंटली असून पाती व फुलांची गळ होत आहे. तसेच काही ठिकाणी रस शोषक कीड व गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सोयाबीनची ११३.०३% पेरणी झाली असून पीक सध्या शेंगा भरण्याच्या संवेदनशील अवस्थेत आहे. पाण्याच्या ताणामुळे शेंगा चपटी राहून दाणे बारीक राहण्याची व हलक्या जमिनीवरील पिके सुकण्याची शक्यता आहे.

 

 मका पिकाची १६३.३४% पेरणी झाली असून पिके कणसे भरण्याच्या अवस्थेत आहेत. अपुऱ्या पावसामुळे वाढ खुंटली असून वजनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.तुरीची १३४.३२% पेरणी झाली असून पाण्याच्या ताणामुळे वाढ खुंटली आहे. खरीप बाजरीची ६३.८३% पेरणी झाली असून पावसाच्या खंडामुळे बाजरीची वाढ खुंटून पीक सुकले आहे. जिल्ह्यात एकूण झालेले पेरणी आणि पिकांच्या परिस्थितीबाबत आढावा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  सुधाकर बोराळे यांनी सादर केला.

0000

Featured post

Lakshvedhi