*राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; १२ महत्त्वपूर्ण . सन २०२६ च्या खरीप हंगामातील अपुरे पाऊस ज्यामुळे पिकांची भयावह स्थिती पाहून मदत व पुनर्वसन विभागाने राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये ‘ अंतर्गत दुष्काळ जाहीर करुन. २५ सप्टेंबर २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर क्र. समिती-२०२६/प्र.क्र.८२/मदत-२) जारी करण्यात आला असून बाधित भागांसाठी १२ मोठ्या सवलती व तातडीच्या उपाययोजना लागू केल्या आहेत.
तर दुसरीकडे, कोकण विभाग दुष्काळ चे सावट खाली आहे असे चित्र दिसते
*दुष्काळग्रस्तांसाठी शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या १२ कलमी प्रमुख सवलती...*
* जमीन महसुलात पूर्ण सूट.
* पिक कर्जाचे पुनर्गठन.
* शेतीशी निगडीत सर्व प्रकारच्या कर्जवसुलीस स्थगिती.
* कृषी पंपांच्या वीजबिलात सवलत: ७.५ हॉर्सपावरपर्यंतचे वीजबिल अगोदरच माफ असून, त्यावरील क्षमतेच्या वीजपंपांना चालू वीजबिलात विशेष सूट.
* विद्यार्थ्यांना दिलासा: शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात संपूर्ण माफी.
* रोजगार हमी योजना (MGNREGA): निकषांमध्ये शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे तात्काळ सुरू करण्याचे निर्देश.
* पाणीपुरवठा: टंचाईग्रस्त भागात आवश्यकतेनुसार तातडीने पिण्याच्या पाण्यासाठी टँकर्सची सोय.
* वीज जोडणी संरक्षण: टंचाईग्रस्त गावांमधील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज जोडणी खंडित करण्यास मनाई.
* अन्नसुरक्षा: शेतीवर अवलंबून असणारे शेतकरी व शेतमजुरांना अन्नधान्याची टंचाई भासू नये यासाठी विशेष अन्नधान्य वितरण व्यवस्था.
* पशुधनाचे रक्षण: जनावरांसाठी मुबलक चारा व छावण्या/व्यवस्था उभारणे.
* जलसंधारण: टंचाई निवारणासाठी जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर सुरू करणे.
* पाण्याचे सूक्ष्म नियोजन: शासन निर्देशांनुसार पिण्याचे पाणी व जनावरांच्या पाण्याचे काटेकोर नियोजन.
*जीपीएस आणि छायाचित्रांसह पंचनामे करण्याचे कडक आदेश...*
२०१६ च्या निकषांनुसार, कृषी आयुक्तांच्या २४ सप्टेंबर २०२६ च्या अहवालानंतर अवघ्या २४ तासांत शासनाने हा निर्णय घेऊन शेतकरी यांना दिलासा देऊन कर्तव्य तत्परता दाखविली आहे.
याशिवाय, प्रत्यक्ष पीक नुकसानीची आर्थिक मदत स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे लवकरच वितरित केली जाणार आहे.
, कोकणातील रायगड (१ तालुका), रत्नागिरी (३ तालुके) आणि सिंधुदुर्ग (८ तालुके) या जिल्ह्यांमधील काही भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने तिथे उपाययोजना लागू
*राज्यातील एकूण दुष्काळग्रस्त तालुक्याची संख्या...*
राज्यातील एकूण २६५ तालुक्यांमध्ये ही परिस्थिती असून छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, अमरावती आणि नागपूर विभागातील बहुतांश तालुक्यांचा यात समावेश आहे. बीड (११), अहिल्यानगर (१४), जळगाव (१५), यवतमाळ (१६), अमरावती (१४), नागपूर (१४), सोलापूर (११) या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर तालुके बाधित झाले आहेत.
दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या बळीराजाला आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला शासनाने खंबीर उभे राहून शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविले.
00000000000
No comments:
Post a Comment